भक्तीरस हा गोड ॥ कितीतरी ॥ भक्तीरस हा गोड ॥धृ०॥
भक्तीरसाचें सेवन करुनी । विषयवासना सोड ॥
कितीतरी ॥ भक्तीरस हा गोड० ॥१॥
भक्तिबळाने श्रीहरी मनुजा । सखा अंतरीं जोड ॥
कितीतरी ॥ भक्तीरस हा गोड० ॥२॥
वारी म्हणे बा हरी भक्तीची । लागु दे अंतरीं ओढ
कितीतरी ॥ भक्तीरस हा गोड० ॥३॥