कितीतरी हससी हरी । प्राणसख्या कृष्णा ॥धृ०॥
काय तुजशी वाटतें नवल । सांग सख्या करुनी विमल ।
नमुनी धरीतें चरणकमल । ऐकण्याची तृष्णा ।
कितीतरी हससो हरी० ॥१॥
सांगुनी करी संशय दूर । मन झालें फार आतुर ।
कृपा करी भक्तावर । पुरवी कामना ।
कितीतरी हससी हरी० ॥२॥
हसत हसत पुसंते वारी । हसत हसत सांग हरी ।
काय म्हणुनी हससी तरी । शांतवी मना ।
कितीतरी हससी हरी० ॥३॥