दत्तगुरु दत्तगुरु जगाचा हा पती ।
जयाच्या हो त्या संगती । जीवा झाली मुक्ति ॥धृ० ॥
पूर्व संचिताच्या योगें । गांठ ती पडली ।
गुरुकृपा होतां चित्तीं । तात्काळ सुटली ।
मोक्ष मार्गीं जाण्याला हो । गुरुआज्ञा झाली ।
निजसदनीं जाउनिया । स्वानंद भोगी ती० ।दत्तगुरु० ॥१॥
गुरुरायें मजलागी । पाठविलें धन ।
प्राप्त होतां झालें त्यांच्या । स्वरुपाचें ज्ञान ।
तेणे मज जगतांत । केलें आजि धन्य ।
काय वर्णूं गुण त्यांचे । वारी अल्पमती ।दत्तगुरु० ॥२॥