भक्तीचा भगवान भोक्ता । भक्तीचा भगवान ॥धृ०॥
भक्तिवांचुनी जपतप साधन । आवडेना तें ध्यान ॥
भोक्ता ॥ भक्तीचा भगवान ॥१॥
प्रेमाने हो एकची आवडे । वाहातां तुळशीपान०
॥भोक्ता॥ भक्तीचा भगवान ॥२॥
वारी म्हणे अर्पिं भक्तीने । हरीपदीं पंचप्राण० ॥
भोक्ता ॥ भक्तीचा भगवान० ॥३॥