मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|भक्तीपर पदें|
भक्तिरसाचा सागर मोठा स्वा...

भक्ति गीत कल्पतरू - भक्तिरसाचा सागर मोठा स्वा...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


भक्तिरसाचा सागर मोठा स्वानंदें भरला ।

भाव धरीतां सद्‌गुरुचरणीं अमृत दे त्याला ॥धृ०॥

सत्याचें तें धैर्य मंदाचळ घट्ट धरुनी ।

सद्‌गुरु शिष्य हेची सुरासुर उभें दो बाजूंनी ।

साक्षेपाने श्रवण मनन हें मंथन करुनी ।

श्रद्धा आणि विश्वास दोर हा विवेक करीं धरुनी ।

नित्यानित्य विचार मंथनें लाभ होय ज्याला ।

भाव धरीतां सद्‌गुरुचरणीं अमृत ते त्याला० ।भक्तिरसाचा० ॥१॥

दृढ बोधाने प्रत्यगा वृत्तीचा अभ्यास करणें ।

अभ्यासामधिं अहंब्रम्हास्मीं विण होतें तेणें ।

जीवदशा सोडुनी शिवरुप होउनी तें पिणें ।

अहंपदाचा त्याग करुनी अमृत करीं घेणें ।

भक्ति सारामृत प्राशन करितां मुक्तची तो झाला ।

भाव धरीतां सद्‌गुरुचरणीं अमृत दे त्याला० ।भक्तिरसाचा० ॥२॥

सद्‌गुरुभक्ति प्रेमें करितां । अमृत त्या देती ।

प्राशन करितां अखंड चित्तीं प्राप्त होय शांती ।

चित्‌सागरिं मग स्वानंदाच्या उठती त्या वृत्ती ।

जिकडे तिकडे स्वानुभवाने वृत्ती ही व्याप्ती ।

वारी म्हणे सद्‌गुरुकृपें प्राप्त होय ज्याला ।

भाव धरीतां सद्‌गुरु चरणीं अमृत दे त्याला० ।भक्तिरसाचा० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP