आवड मला श्रीहरी भजनाची । प्रिय वाटें बहु तेंची ॥धृ०॥
निशिदिनि वाटें भजन करोनी । लीला ही वर्णावी त्याची ।
प्रिय वाटें बहु तेंची० ॥१॥
अक्षयि वृत्ती पदीं जडवुनी । प्रेमें गावीं गीतें त्याचीं ।
प्रिय वाटें बहु तेंची० ॥२॥
ऐसी वृत्ती करी मम देवा । आस ही वारिची ।
प्रिय वाटें बहु तेंची० ॥३॥