राधा गवळण हरी तुझी प्यारी । प्रेमळ भक्ति तिची भारी ॥धृ०॥
तुजवांचुनी अन्य न कांही । राधेला प्रिय दुजें नाही ।
संसारीं चित्त मुळी नाही । तव स्वरुपीं वृत्ती राही ॥चाल॥
लागला छंद अंतरीं । राधा गवळण हरी तुझी प्यारी० ॥१॥
राधेची भक्ति पाहुन । श्रीहरी गेला मोहुन ।
तिच्या गृहाप्रती जावुन । झाला मोठा होतां तो लहान ॥चाल॥
तिच्या प्रेमाने भुलला हरी । राधा गवळन हरी तुझी प्यारी० ॥२॥
राधेचा शुद्ध तो भाव । पाहुनी भुलला देव ।
टाकिला तिने द्वैतभाव । हरी स्वरुपीं दिधला ठाव ॥चाल॥
तो भक्तिमार्ग धरी वारी । राधा गवळण हरी तुझी प्यारी० ॥३॥