नको दूर करुं० । तूं माय मी लेकरुं० ॥धृ०॥
मायलेकरा नाही भेद । देह द्वैताचा संबंध ।
होतां स्वरुपाचा तो बोध । त्यांतची नुरुं । तूं माय० ॥१॥
जैसा सागरीं तरंग । तोची तरंग त्याचेची अंग ।
तेथे नाही दुजा संग । दुजे नुरुं० । तूं माय० ॥२॥
दोन नयना एकची दृष्टी । नाना रुपें एकची सृष्टी ।
मायलेकरा एकची व्यष्टी । नाही अंतरुं० । तूं माय० ॥३॥
ऐसा एकी एक असुनी । भेद केला ह्या मायेनी ।
वारी म्हणे हरिपदिं नमुनी । द्वैत वारुं० । तूं माय० ॥४॥