देवाला जाऊं ॥ सख्यांनो० ॥ शामसुंदर मूर्ती पाहूं ॥धृ०॥
रुणुझुणु रुणुझुणु चरणीं त्याचे । नूपुर वाजे बहु० ।
त्याचे नूपुर वाजे बहु ॥सख्यांनो०॥ शामसुंदर मूर्ती पाहूं० ॥१॥
श्यामसुंदर मूर्ती हरीची । गोजिरी दिसते बहू ।
हरीची गोजिरी दिसते बहू ॥सख्यांनो०॥शामसुंदर मूर्ती पाहूं० ॥२॥
नाना परीचे हार मनोहर । प्रेमाने नेऊं । हरीला प्रेमाने नेवूं ॥सख्यांनो०॥शामसुंदर० ॥३॥
स्थीर करुनि मन हें आपुलें । हृदयीं मूर्ती पाहूं ।
हरीची हृदयीं मूर्ती पाहूं ॥सख्यांनो०॥शामसुंदर० ॥४॥
तन मन धन हें अर्पण करुनी । मुक्त आपण होऊं ॥सख्यांनो०॥
मुक्त आपण होऊं ॥सख्यांनो०॥शामसुंदर० ॥५॥
दिनरजनीं प्रेमें गीत हरीचें । वारी म्हणे गाऊं ॥
सख्यांनो० ॥ वारी म्हणे गाऊं । सख्यांनो० ॥शामसुंदर० ॥६॥