मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अल्‌मुअ‌मिनून

सूरह - अल्‌मुअ‌मिनून

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ११८)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे. निश्चितच यश प्राप्त केले आहे श्रद्धावंतांनी, जे आपल्या नमाजमध्ये नम्रता अंगिकारतात, व्यर्थ गोष्टींपासून दूर राहतात, जकातच्या पद्धतीची अंमलबजावणी करतात, आपल्या गुप्तांगांचे रक्षण करतात. आपल्या गुप्तांगांचे रक्षण करतात. आपल्या पत्नी व त्या स्त्रियांखेरीज ज्या त्यांच्या अधिकृत मालकीत आहेत ज्यांच्यापासून (सुरक्षित न ठेवण्यात) ते निंदनीय नाहीत, परंतु जे त्याखेरीज अन्य काही इच्छित असतील तर तेच आगळीक करणारे आहेत. आपल्या अमानती आणि आपल्या वचनांचा व करारांचा मान राखतात. आणि आपल्या नमाजचे रक्षण करतात. हेच लोक ते वारस आहेत जे वारशात नंदनवन प्राप्त करतील आणि त्यात सदैव राहतील. (१-११)

आम्ही मानवाला मातीच्या सत्वापासून बनविले, मग त्याला एका सुरक्षित जागी ठिबकलेल्या थेंबात परिवर्तित केले, मग त्या थेंबाला गुठ्ळीचा आकार दिला, नंतर गुठळीला
बोटी बनविले, मग बोटीची हाडे बनविली, ‘नतर हाडावर मांस चढविले मग त्याला एक दुसरी निर्मिती बनवून उभे केले, तर मोठा यशदायी आहे अल्लाह सर्व निर्मात्यांपेक्षा चांगला निर्माता. मग त्यानंतर तुम्हाला अवश्य मरावयाचे आहे. नंतर पुनरुत्थानाच्या दिवशी निश्चितपणे तुम्ही उठविले जाल. आणि तुमच्यावर आम्ही सात रस्ते बनविले, निर्मितीकार्यापासून आम्ही अजाण नव्हतो, आणि आकाशातून आम्ही ठीक हिशेबानुसार एका विशिष्ट प्रमाणात पाणी उतरविले आणि त्याला पृथ्वीत स्थिरावले, आम्हि त्याला हवे तसे नाहीसे करू शकतो. मग त्या पाण्याद्वारे आम्ही तुमच्यासाठी खजूर व द्राक्षाच्या बागा उत्पन्न केल्या, तुमच्यासाठी या बागांमध्ये पुष्कळशी स्वादिष्ट फळे आहेत आणि यांच्यापासून तुम्ही उपजीविका मिळविता. आणि तो वृक्षदेखील आम्ही निर्माण केला जो तुरेसीना (पर्वत) मधून निघतो. तेलसुद्धा घेऊन उगवतो आणि खाणार्‍यासाठी कालवणसुद्धा. (१२-२०)

आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुमच्यासाठी जनावरांतदेखील एक बोध आहे. त्यांच्या पोटात जे काही आहे त्याच्यातूनच एक पदार्थ (म्हणजे दूध) आम्ही तुम्हाला पाजतो. आणि तुमच्यासाठी त्यात बरेचसे अन्य फायदेसुद्धा आहेत. त्यांना तुम्हा खाता, आणि त्यांच्यावर व होडयांवर स्वारदेखील केले जाता. (२१-२२)

आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकसमूहाकडे पाठविले. त्याने म्हटले, “हे माझ्या बांधवानो! अल्लाहची भक्ती करा. त्याच्याशिवाय तुमच्यासाठी कोणीही ईश्वर नाही, तुम्ही भीत नाही का?” त्याच्या लोकसमूहाच्या ज्या सरदारांनी मानण्यास नकार दिला ते म्हणू लागले की, “हा व्यक्ती काहीच नाही परंतु एक मनुष्य तुमच्यासारखा. याचा हेतू असा आहे की तुमच्यावर वर्चस्व प्राप्त करावे. अल्लाहला जर पाठवावयाचे असते तर दूत पाठविले असते. ही गोष्ट तर आम्ही कधी आपल्या वाडवडिलांच्या वेळी ऐकलीच नाही (की मानव पैगंबर म्हणून यावा). काहीच नाही. केवळ या माणसाला जरा वेड लागले आहे. काही काळ आणखी वाट पहा (कदाचित बरा होईल).” नूह (अ.) ने सांगितले, “हे पालनकर्त्या, या लोकांनी जे मला खोटे ठरविले आहे यावर आत तूच मला सहाय्य दे.” आम्ही त्याच्याकडे दिव्य बोध केला की आमच्या देखरेखीत व आमच्या दिव्य बोधानुसार नौका तयार कर, मग जेव्हा आमची आज्ञा येईल आणि तो जलप्रलय उसळू लागेल तेव्हा प्रत्येक प्रकारच्या प्राण्यांपैकी एक एक जोडी घेऊन तिच्यात स्वार हो. आणि आपल्या कुटुंबियांनादेखील सोबत घे, त्यांच्याव्यतिरिक्त ज्यांच्याविरूद्ध अगोदर निर्णय झाला आहे आणि अत्याचार्‍यांच्या संबंधात मला काही सांगू नकोस. हे आता बुडणारे आहेत. मग जेव्हा तू आपल्या सोबत्यांसमवेत नौकेवर स्वार होशील तेव्हा म्हण, “धन्य आहे तो अल्लाह ज्याने आम्हाला अत्याचारी लोकांपासून मुक्ती दिली आणि म्हण, हे पालनकर्त्या, मला समृद्धशाली जागी उतरव आणि तूच सर्वोत्तम जागा देणारा आहेस!” (२३-२९)

या कथेत मोठे संकेत आहेत आणि परीक्षा तर आम्ही घेत असतोच. (३०)

त्यांच्यानंतर आम्ही एक दुसर्‍या युगातील लोकसमूह उभा केला. मग त्यांच्यात खुद्द त्यांच्याच लोकांतील एक प्रेषित पाठविला. (ज्याने त्यांना निमंत्रण दिले) की अल्लाहची भक्ती करा, तुमच्यासाठी त्याच्याशिवाय अन्य कोणी उपास्य नाही. तुम्ही भीत नाही काय? त्याच्या लोकसमूहाच्या ज्या सरदारांनी मानण्यास नकार दिला आणि परलोकाच्या अस्तित्वास खोटे ठरविले, ज्यांना आम्ही जगातील जीवनात सुखी ठेवले होते, ते म्हणू लागले, “ही व्यक्ती कोणी नाही परंतु एख मनुष्य तुमच्याच सारखा. जे काही तुम्ही खाता तेच हा खातो आणि जे काही तुम्ही पिता तेच हा पितो. आता जर तुम्ही आपल्या सारख्याच एका माणसाची आज्ञाधारकता स्वीकारली तर तुम्ही नुकसानीतच राहाला. हा तुम्हाला कळवितो की जेव्हा तुम्ही मेल्यानंतर माती व्हाल आणि जेव्हा हाडांचा सांगाडा बनून राहाल तेव्हा तुम्ही (कबरीतून) काढले जाल. असंभव, पूर्णत: असंभव आहे हे वचन, जे तुमच्याशी केले जात आहे. जीवन काहीच नाही परंतु केवळ या जगातीलच जीवन, येथेच आम्हाला मरावयाचे व जगावयाचे आहे आणि आम्ही कदापि उठविले जाणार नाही. हा माणूस केवळ अल्लाहच्या नावाने असत्य रचीत आहे, आणि आम्ही कदापि याचे मानणारे नाही.” प्रेषिताने सांगितले, “हे पालनकर्त्या, या लोकांनी जे मला खोटे ठरविले आहे पावर आता तूच मला सहाय्य कर.” उत्तरात फर्माविले गेले, “जवळ आहे ती घटका जेव्हा ते आपल्या कृत्यावर पश्चात्ताप करतील.” सरतेशेवटी तंतोतंत सत्याबरहुकुम एका महान कल्लोळाने त्यांना गाठले आणि आम्ही त्यांना कचरा बनवून फेकून दिले. दूर हो अत्याचारी लोकसमूहा! (३१-४१)

मग आम्ही त्याच्यानंतर दुसरे लोकसमूह उठविले. कोणताही जनसमूह आपल्या वेळेपूर्वीही नष्ट झाला नाही की त्यानंतर तग धरू शकला नाही. मग आम्हीज लागोपाठ आपले पैगंबर पाठवीत राहिलो. ज्या कुणा समूहापाशी त्याचा पैगंबर आला त्याने त्यास खोटे ठरविले, आणि आम्ही एकापाठोपाठ एका लोकसमुदायास नष्ट करीत गेलो, येथपावेतो की आम्ही त्यांना केवळ एक कथा बनवून सोडले. धिक्कार असो त्या लोकांचा जे श्रद्धा ठेवत नाहीत! (४२-४४)

मग आम्ही मूसा (अ.) व त्याचा भाऊ हाऊन (अ.) यांना आपली संकेतवचने आणि उघड प्रमाणासहित फिरऔन आणि त्याच्या सहाकार्‍यांकडे पाठविले, परंतु त्यांनी गर्व केला आणि बडेजाव केला म्हणू लागले, “काय आम्ही आमच्याच सारख्या दोन माणसांवर श्रद्धा ठेवावी? आणि माणसेही ती, ज्यांचा लोकसमूह आमचा गुलाम आहे?” म्हणून त्यांनी दोघांना खोटे ठरविले आणि नष्ट होणार्‍यांना जाऊन मिळाले आणि मूसा (अ.) ला आम्ही ग्रंथ प्रदान केला की जेणेकरून लोकांनी त्यापासून मार्गदर्शन प्राप्त करावे. (४५-४९)

आणि मरयमपुत्राला व त्याच्या आईस आम्ही एक संकेत बनविले आणि त्यांना एका पठारावर ठेवले जी समाधानाची जागा होती आणि झरे त्यात वाहात होते. (५०)

हे पैगंबरानो! शुद्ध पदार्थ खा आणि चांगली कर्मे करा, तुम्ही जे काही करता मी ते चांगलेच जाणतो आणि तुमचा हा लोकसमूदाय (उम्मत) एकच लोकसमूदाय आहे आणि मी तुमचा पालनकर्ता आहे., म्हणून तुम्ही माझीच भीती बाळगा. (५१-५२)

परंतु नंतर लोकांनी आपल्या दीन-धर्माचे आपापसांत तुकडे तुकडे करून टाकले. प्रत्येक गटाजवळ जे काही आहे त्याच्यातच तो मग्न आहे, तर सोडून द्या यांना, बुडून राहू द्या आपल्या असावधानतेत एका विशिष्ट वेळेपर्यंत. (५३-५४)

काय यांना वाटते की आम्ही यांना संपत्ती व संततीने मदत करीत आहोत तर जणूकाय यांना कल्याणकारी गोष्टी देण्यात उत्साही आहोत? नव्हे, वस्तुस्थितीची यांना जाण नाही. वास्तविकत: जे लोक आपल्या पालानकर्त्याच्या धास्तीने भयभीत होणारे असतात, जे आपल्या पालनकर्त्याच्या संकेतांवर श्रद्धा ठेवतात. जे आपल्या पालनकर्त्याबरोबर कोणाला भागीदार बनवीत नाही, आणि ज्यांची स्थिती अशी आहे की देतात जे काही देतात आणि ह्र्दयाचा त्यांचा या विचाराने थरकांप होत असतो की आम्हाला आमच्या पालनकर्त्याकडे परतावयाचे आहे, तेच भल्या गोष्टीकडे धाव घेणारे आणि अहमहमिका करून त्यांना प्राप्त करणारे आहेत. आम्ही कोणत्याही इसमाला त्याच्या आवाक्यापेक्षा जास्त आजमावत नसतो आणि आमच्याजवळ एक ग्रंथ आहे जो (प्रत्येकाची स्थिती) यथायोग्य दाखविणारा आहे, आणि लोकांवर अत्याचार कोणत्याही परिस्थितीत केला जाणार नाही. परंतु हे लोक या गोष्टीपासून अजाण आहेत आणि त्यांची कृत्येसुद्धा त्या पद्धती (जिचा वर उल्लेख केला गेला आहे) पासून वेगळी आहेत. ते आपली ही कृत्ये करीत राहतील येथपावेतो की जेव्हा आम्ही त्यांच्या विलासी लोकांना प्रकोपात पकडू तेव्हा ते मदतीसाठी ओरडू लागतील. आता बंद करा मदतीसाठी गयावया, आमच्याकडून आता कोणतेही सहाय्य तुम्हाला मिळणार नाही. माझे संकेत ऐकविले जात असत तेव्हा तुम्ही (पैगंबराचा आवाज ऐकताच) परत पावली पळत सुटत होता. आपल्या दर्पात त्याची पर्वा करीत नव्हता, चव्हाटयावर ह्याविषयी बाता मारीत होता आणि बकवास करीत होता. (५५-६७)

मग या लोकांनी कधी या वाणीवर विचार केला नाही? अथवा त्याने एखादी अशी गोष्ट आणली आहे जी कधी त्यांच्या पूर्वजांपर्यंत  आली नव्हती? अथवा हे आपल्या पैगंबराशी कधी परिचित नव्हते की (अनोळखी मनुष्य असल्यामुळे) त्याला बिचकतात? अथवा यांचे म्हणणे असे आहे की तो वेडा आहे? नव्हे किंबहुना त्याने तर सत्य आणले आहे आणि सत्यच त्याच्यातील बहुतेकांना अप्रिय आहे-आणि सत्य जर कोठे त्यांच्या इच्छेमागे चालले असते तर आकाश व पृथ्वी आणि त्यांच्या सर्व वस्तीची व्यवस्था कोलमडली असती-नव्हे, तर आम्ही त्यांचा स्वत:चाच उल्लेख त्यांच्यापाशी आणला आहे आणि ते आपल्या उल्लेखापासून तोंड फिरवीत आहेत. (६८-७१)

तू त्यांच्याकडून काही मागत आहेस काय? तुझ्यासाठी तर तुझ्या पालनकर्त्याने दिलेलेच उत्तम आहे आणि तो उत्तम उपजीविका देणारा आहे. तू तर त्यांना सरळ मार्गाकडे बोलावीत आहेस, परंतु जे लोक मरणोत्तर जीवनाला मानत नाहीत ते सरळ मार्गापासून दूर राहून चालू इच्छितात. (७२-७४)

जर आम्ही यांच्यावर दया केली आणि तो त्रास ज्यात हे हल्ली गुरफटलेले आहेत, दूर केला, तर हे आपल्या दुराचारात पूर्णपणे बहकतील. यांची स्थिती तर अशी आहे की आम्ही यांना यातनेत गुरफटविले तरीसुद्धा हे आपल्या पालनकर्त्याच्या पुढे झुकले नाहीत आणि नम्रतादेखील स्वीकारीत नाहीत. तथापि जेव्हा अवस्था या शिगेला येईल की आम्ही यांच्यावर भयंकर प्रकोपाचे द्वार उघडू तर अकस्मात तुम्ही पाहाल की त्या परिस्थितीत ते प्रत्येक भल्या गोष्टीपासून निराश असतील. (७५-७८)

तो अल्लाहच तर आहे ज्याने तुम्हाला ऐकण्याची व पाहण्याची शक्ती दिली आणि विचार करण्यासाठी मन दिले. परंतु तुम्ही लोक कमीच कृतज्ञ होता. तोच आहे ज्याने तुम्हाला पृथ्वीतलावर पसरविले आणि त्याच्याकडेच तुम्ही एकत्र केले जाल. तोच जीवन प्रदान करतो आणि तोच मृत्यू देतो, रात्र व दिवसाचे भ्रमण त्याच्याच सामर्थ्यकक्षेत आहे. तुमच्या लक्षात ही गोष्ट येत नाही का? परंतु हे लोक तेच काही सांगतात जे यांच्या पूर्वयांनी सांगून ठेवले आहे. हे म्हणतात, “आम्ही जेव्हा मरून माती बनू आणि हाडांचे सांपळे बनून राहू तेव्हा आम्हाला परत जिवंत करून उठविले जाईल काय? आम्ही सुद्धा असली वचने खूप ऐकली आहेत आणि आमच्यापूर्वी आमचे वाडवडीलसुद्धा ऐकत राहिले आहेत. या केवळ पुराणकथा आहेत.” (७९-८३)

यांना सांगा, दाखवा जर तुम्हाला माहीत असेल की ही पृथ्वी व हिची सर्व वस्ती कुणाची आहे? हे जरूर म्हणतील, अल्लाहची. सांगा, मग तुम्ही शुद्धीवर का येत नाही? यांना विचारा, सप्त आकाश आणि महान सिंहासनाचा स्वामी कोण आहे? हे जरूर म्हणतील, अल्लाह. सांगा, मग अल्लाहशी परायण का होत नाही? यांना सांगा, दाखवा जर तुम्ही जाणत असाल की प्रत्येक वस्तूवर सत्ता कुणाची आहे? आणि कोण आहे जो आश्रय देतो आणि त्याच्याविरूद्ध कोणी आश्रय देऊ शकत नाही? हे जरूर म्हणतील की ही गोष्ट तर अल्लाहसाठीच आहे. सांगा, मग कोठून तुमची फसगत होत आहे? जी सत्य बाब आहे ती आम्ही यांच्यासमोर आणली आहे आणि काही शंका नाही की हे लोक खोटारडे आहेत. अल्लाहने कोणासही आपली संतती बनविले नाही, आणि कोणी दुसरा ईश्वर त्याच्यासमवेत नाही. जर असे असते तर प्रत्येक ईश्वर आपल्या सृष्टीला घेऊन वेगळा झाला असता, आणि मग ते एकदुसर्‍यावर चालून आले असते. पवित्र आहे अल्लाह त्या गोष्टींपासून ज्या हे लोक रचतात. दृश्य व अदृश्याचे ज्ञान राखणारा तो सर्वोच्च आहे त्या अनेकेश्वरवादापासून जे हे लोक योजीत आहेत. (८४-९२)

हे पैगंबर (स.)! प्रार्थना करा, “हे पालनकर्त्या, ज्या प्रकोपाची यांना धमकी देण्यात येत आहे तो माझ्या उपस्थितीत जर तू आणला, तर हे माझ्या पालनकर्त्या! या अत्याचारी लोकांत माझा समावेश करू नकोस.” आणि वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही तुमच्या डोळ्यांदेखतच ती गोष्ट आणण्याचे पूर्ण सामर्थ्य राखतो ज्याची धमकी आम्ही यांना देत आहोत. (९३-९५)

हे पैगंबर (स.)! वाईटाचे निवारण सर्वोत्कृष्ट पद्धतीने करा. ज्या काही गोष्टी ते तुम्हावर रचतात त्या आम्हाला पुरेपूर माहीत आहेत. आणि प्रार्थना करा की. “हे पालनकर्त्या! मी शैतानाच्या दुष्प्रेरणेपासून तुझा आश्रय मागतो, इतकेच नव्हे तर हे माझ्या पालनकर्त्या, मी तर यापासूनदेखील तुझा आश्रय मागतो की ते माझ्यापाशी येतील. (९६-९८)

(हे लोक आपल्या कृत्यापासून परावृत्त होणार नाहीत) इथपावेतो की जेव्हा यांच्यापैकी एखाद्याला मरण येईल तेव्हा सांगू लागेल की, “हे माझ्या पालनकर्त्या, मला त्याच जगात परत पाठव, जे मी सोडून आलो आहे, आशा आहे की मी आता सत्कर्म करीन.” मुळीच नाही, ही तर केवळ एक गोष्ट आहे जी तो बरळत आहे. आता या सर्व (मरणार्‍यांच्या) मागे एक आड (बरजख) आहे. मरणोत्तर जीवनाच्या दिवसापर्यंत, मग ज्या क्षणी शिंग फुंकले जाईल त्यांच्यात मग कोणतेही नाते उरणार नाही आणि ते एकमेकाला विचारणारदेखील नाहीत. त्यावेळेस ज्यांचे पारडे जड असेल तेच यश संपादन करतील आणि ज्यांचे पारडे हलके असेल तेच लोक असतील ज्यांनी आपल्या स्वत:ला तोटयात घातले, ते नरकात सदैव राहतील. अग्नी त्यांच्या मुखाचे चामडे भक्ष करून टाकील आणि त्यांचे जबडे बाहेर निघतील. “काय तुम्ही तेच लोक नाहीत की माझे संकेत तुम्हाला ऐकविले जात होते तेव्हा तुम्ही त्यांना खोटे ठरवीत होता?” ते सांगतील, “हे आमच्या पालनकर्त्या, आमच्या दुर्दैवाने आम्हाला व्यापिले होते. आम्ही  खरोखरच पथभ्रष्ट लोक होतो. हे पालनकर्त्या! आता आम्हाला यातून बाहेर काढ. मग जर आम्ही अपराध केला तर अत्याचारी ठरू.” सर्वश्रेष्ठ अल्लाह उत्तर देईल. “दूर व्हा माझ्या समोरून, पडून राहा त्यामध्येच आणि माझ्याशी पोलू नका. तुम्ही तेच लोक तर आहात की माझे काही दास जेव्हा सांगत होते की हे आमच्या पालनकर्त्या, आम्ही श्रद्धा ठेवली, आम्हाला क्षमा कर आम्हावर दया दाखव, तू सर्व दया दाखवणार्‍याहून उत्तम दयाळू आहेस, तेव्हा तुम्ही त्यांचा उपहास केला येथपावेतो की त्यांच्या ह्रट्टापायी तुम्ही हेदेखील विसरला, की मीदेखील कोणी आहे, आणि तुम्ही त्यांच्यावर हसत राहिला. आज त्यांच्या त्या संयमाचे मी हे फळ दिले आहे की तेच यशस्वी आहेत.” मग सर्वश्रेष्ठ अल्लाह त्यांना विचारील, “सांगा, पृथ्वीतलावर तुम्ही किती वर्षे राहिलात? ते सांगतील, “एक दिवस अथवा दिवसाचाही काही अंश आम्ही तेथे राहिलो आहोत, गणना करणार्‍यांना विचारून घ्या.” फर्माविले जाईल, “थोडाच वेळ राहिला आहात ना, त्याचवेळी तुम्ही हे जाणले असते. काय तुम्ही हे समजून बसला होता की आम्ही तुम्हाला व्यर्थच निर्माण केले आहे आणि तुम्हाला आमच्याकडे कधी परतावयाचेच नाही?” (९९-११५)

म्हणून सर्वोच्च आहे अल्लाह, खरा सम्राट, कोणी परमेश्वर त्याच्याशिवाय नाही. स्वामी आहे महान सिंहासनाचा आणि जो कोणी अल्लाहसहित एखाद्या अन्य उपास्याचा धावा करील ज्याच्यासंबंधी त्याच्याजवळ कोणताच पुरावा नाही, तर त्याचा हिशेब त्याच्या पालनकर्त्याजवळ आहे. असले द्रोही कधीच यश संपादन करू शकत नाहीत. (११६-११७)

हे पैगंबर (स.)! सांगा, माझ्या पालनकर्त्या! क्षमा कर आणि दया दाखव आणि तू सर्व दया दाखविणार्‍यांपेक्षा उत्तम दय़ाळू आहेस. (११८)

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP