सूरह - अत्तारीक
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने १७)
अल्लाहच्या नवाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
शपथ आहे आकाशाची आणि रात्री प्रकट होणार्याची. तुम्हाला काय माहीत की तो रात्री प्रकट होणारा काय आहे? चमकत असलेला तारा, कोणताही जीव असा नाही ज्याच्यावर कोणी निगाह राखणारा नाही, मग जरा मानवाने हेच पाहून घ्यावे की तो कोणत्या वस्तूने निर्माण केला गेला आहे. एका उसळणार्या पाण्यापासून निर्माण केला गेला आहे जे पाठीच्या आणि छातीच्या हाडांच्या मधून निघते. खचितच तो (निर्माणकर्ता) त्याला पुन्हा निर्माण करण्यास समर्थ आहे. ज्या दिवशी गुप्त रहस्यांची तपासणी होईल त्यावेळी मानवाजवळ न त्याच्या स्वत:चे बळ असेल आणि न कोणी त्याला सहाय्य करणारा असेल. शपथ आहे पाऊस वर्षविणार्या आकाशाची आणि (वनस्पती उगविताना) भग्न होणार्या जमिनीची, ही एक तोलामोलाची प्रमाणित गोष्ट आहे थट्टामस्करी नव्हे. हे लोक (अर्थात मक्कातील अश्रद्धावंत) काही चाली खेळत आहेत आणि मीसुद्धा एक चाल खेळत आहे. म्हणून सोडून द्या हे पैगंबर (स.), या अश्रद्धावंतांना, किंचित, जराशा यांच्या स्थितीत सोडा. (१-१७)
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2013
TOP