मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अज्‌जुहा

सूरह - अज्‌जुहा

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ११)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

शपथ आहे प्रकाशमान दिवसाची आणि रात्रीची जेव्हा ती शांतपणे पसरते. (हे पैगंबर (स.),) तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला मुळीच सोडलेले नाही आणि तो नाराजही झाला नाही. निश्चितच तुमच्यासाठी नंतरचा काळ अगोदरच्या काळापेक्षा उत्तम आहे. लवकरच तुमचा पालनकर्ता तुम्हाला इतके देईल की तुम्ही प्रसन्न व्हाल. काय त्याने तुम्हाला अनाथ पाहिले नाही. मग त्याने तुम्हाला अनभिज्ञ्स पाहून मार्गदर्शन केले. आणि तुम्ही गरीब आढळला आणि मग श्रीमंत केले. म्हणून अनाथावर सक्ती करू नका, आणि याचकाला झिडकारू नका. आणि आपल्या पालनकर्त्याच्या देणगीची अभिव्यक्ती करा. (१-११)

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP