सूरह - अल्हुमज:
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने ९)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
विनाश आहे त्या प्रत्येक माणसासाठी ज्याला लोकांना टोमणे मारण्याची व (पाठीमागे) निंदा करण्याची सवय आहे, ज्याने धन गोळा केले आणि मोजून मोजून ठेवले. तो समजतो की त्याचे धन सदैव त्याच्यापाशी राहील, कदापि नाही, तो मनुष्य तर चक्काचूर करून टाकणार्या जागी फेकून दिला जाईल आणि तुम्हाला काय माहीत की काय आहे ती चक्काचूर करणारी जागा? अल्लाहचा अग्नी, खूप भडकलेला, जो ह्रदयापर्यंत पोहचेल, तो त्यांच्यावर झाकून बंद केला जाईल. (अशा अवस्थेत की ते) उंचउंच स्तंभात (वेढले गेले असतील) (१-९)
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2013
TOP