सूरह - अल्अलक
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने १९)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
वाचा, (हे पैगंबर (स.)) आपल्या पालनकर्त्याच्या नामासहित ज्याने निर्माण केले, गोठलेल्या रक्ताच्या एका गुठळीपासून मानवाची निर्मिती केली. वाचा, आणि तुमचा पालनकर्ता मोठा उदार आहे, ज्याने लेखणीद्वारे ज्ञान शिकविले, मानवाला ते ज्ञान दिले जे तो जाणत नव्हता. (१-५)
कदापि नाही, मानव मर्यादाभंग करतो आहे, या कारणास्तव की तो आपल्या स्वत:ला स्वयंपूर्ण पाहतो. (वस्तुत:) आपल्या पालनकर्त्याकडेच, त्याला परत जायचे आहे.
तुम्ही पाहिले त्या माणसाला जो एका दासाला मनाई करतो, जेव्हा तो नमाज पढत असतो? तुमचा काय विचार आहे जर तो सरळ मार्गावर असता किंवा ईशपरायणतेचा आदेश देत असता? तुमचा काय विचार आहे जर (हा मनाई करणारा माणूस सत्याला) खोटे ठरवीत आहे व विमुख होत आहे? काय त्याला माहीत नाही की अल्लाह पहात आहे? कदापि नाही, जर तो परावृत्त झाला नाही तर आम्ही त्याला, कपाळाचे केस धरून ओढू, त्या कपाळाचे जे खोटारडे व मोठे गुन्हेगार आहेत. त्याने बोलवावे आपल्या समर्थकांच्या टोळीला, आम्हीसुद्धा प्रकोपाच्या दूतांना बोलावून घेऊ. कदापि नाही, त्याचे म्हणणे ऐकू नका. आणि नतमस्तक व्हा. व (आपल्या पालनकर्त्याशी) जवळीक साधा. (६-१९)
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2013
TOP