मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अल्‌कारिया

सूरह - अल्‌कारिया

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ११)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

प्रचंड घटना! काय आहे ती प्रचंड घटना? तुम्हाला काय ठाऊक की ती प्रचंड घटना काय आहे? तो दिवस जेव्हा लोक विखुरलेल्या पतंग्यांसमान आणि पर्वत रंगीबेरंगी पिंजलेल्या लोकरीप्रमाणे असतील. मग ज्याचे पारडे जड असेल तो मनपसंत ऐश्वर्यात असेल, आणि ज्याचे पारडे हलके असेल त्याचे विश्रामधाम खोल खाई असेल, आणि तुम्हाला काय ठाऊक की ती वस्तू काय आहे? भडकणारा अग्नी. (१-११)

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP