सूरह - अल्आदीयात
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने ११)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
शपथ आहे त्या (घोडयांची) जे फुत्कार टाकीत धावतात मग (अपाल्या टापांनी) ठिणग्या उडवितात. मग सकाळी सकाळी छापा मारतात. मग त्या प्रसंगी धुळीचे लोट उसळतात. मग अशा स्थितीत एखाद्या जमावात शिरतात. वस्तुस्थिती अशी आहे की मानव आपल्या पालनकर्त्याशी फार कृतघ्न आहे. आणि तो स्वत: याला साक्षी आहे. आणि तो धनदौलतीच्या प्रेमात तीव्रपणे गुरफटलेला आहे. तर काय तो त्या वेळेला जाणत नाही जेव्हा थडग्यात जे काही (दफन केलेले आहे) ते काढले जाईल आणि ह्रदयात जे काही (लपलेले) आहे ते काढले जाऊन त्याची तपासणी केली जाईल? निश्चितच त्यांचा पालनकर्ता त्या दिवशी त्यांच्याशी चांगलाच परिचित असेल. (१-११)
Last Updated : November 18, 2013
TOP