सूरह - अल्इन्फितार
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने १९)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
जेव्हा आकाश फाटेल आणि जेव्हा तारे विस्कळून पडतील आणि समुद्रा फाडून टाकले जातील आणि कबरी उघडल्या जातील त्यावेळी प्रत्येक प्रत्येक माणसाला त्याने पुढचे मागचे केले सवरलेले सर्व कळेल. (१-५)
हे मानवा, कोणत्या गोष्टीने तुला आपल्या उदार पालनकर्त्याच्या बाबतीत संभ्रमात टाकले ज्याने तुला निर्माण केले, तुला नखशिखांत व्यवस्थित केले, तुला प्रमाणबद्ध बनविले, आणि ज्या रूपात इच्छिले तुला जोडून तयार केले? कदापि नाही. तर (खरी गोष्ट अशी आहे की) तुम्ही लोक मोबदला व शिक्षेला खोटे ठरविता वस्तुत: तुमच्यावर निरीक्षक नेमले आहे, असे सन्माननीय लिहिणारे जे तुमच्या प्रत्येक कृत्याला जाणतात. (६-१२)
खचितच सदाचारी लोक मजेत असतील आणि दुराचारी लोक नरकात जातील. बदल्याच्या दिवशी ते तिच्यात दाखल होतील आणि तिच्यातून मुळीच बाहेर पडू शकणार नाहीत. आणि तुम्ही काय जाणता की तो बदल्याचा दिवस काय आहे? होय, तुम्हाला काय कल्पना की बदल्याचा तो दिवस काय आहे? हा तो दिवस आहे जेव्हा कोणत्याही माणसासाठी काही करणे कुणाच्याही आवाक्यात नसेल. निर्णय त्या दिवशी अल्लाहच्याच अखत्यारीत असेल. (१३-१९)
Last Updated : November 18, 2013
TOP