सूरह - अल्आला
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने १९)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
(हे पैगंबर (स.)) आपल्या उच्चतर पालनकर्त्याच्या नावाचे पवित्र्य गान करा ज्याने निर्माण केले व प्रमाणबद्धता प्रस्थापित केली. ज्याने भाग्य बनविले मग मार्ग दाखविला. ज्याने वनस्पती उगविल्या, मग त्यांना काळा केरकचरा बनवून टाकला. (१-५)
आम्ही तुम्हाला पठण करवू मग तुम्ही विसरणार नाही त्याखेरीज की अल्लाहने ज्याची इच्छा करावी. तो प्रकटही जाणतो आणि जे काही गुप्त आहे ते सुद्धा. (६-७)
आणि आम्ही तुम्हाला सुलभ पद्धतीची सवलत देतो, म्हणून तुम्ही उपदेश करा, जर उपदेश लाभदायक असेल. जो मनुष्य भितो तो उपदेश स्वीकारील आणि त्याच्यापासून अलिप्त राहील तो अत्यंत दुर्दैवी जो मोठया अग्नीत जाईल. मग तो मरणारही नाही व जिवंतही राहणार नाही. (८-१३)
सफल झाला तो ज्याने पावित्र्य अंगिकारले आणि आपल्या पालनकर्त्याचे नामस्मरण केले. मग नमाज अदा केली. परंतु तुम्ही लोक ऐहिक जीवनाला प्राधान्य देता वास्तविकपणे परलोक उत्तमा आहे आणि बाकी उरणारा आहे. हीच गोष्ट अगोदर आलेल्या पुस्तिकातसुद्धा सांगितली गेली होती. इब्राहीम (अ.) आणि मूसा (अ.) यांच्या पुस्तिकात. (१४-१९)
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2013
TOP