सूरह - अल्लहब
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने ५)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
तुटून गेले अबू लहबचे हात आणि विफल झाला तो. त्याची मालमत्ता आणि जे काहीज त्याने कमविले ते त्याच्या काहीच उपयोगी पडले नाही. अवश्य तो उसळत्या ज्वालांच्या अग्नीत टाकला जाईल आणि (त्याच्याबरोबर) त्याची पत्नीसुद्धा. आगलावेपणा करणारी, तिच्या मानेत अग्निचा तळपता दोर असेल. (१-५)
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2013
TOP