सूरह - अत्तकासुर
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने ८)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
तुम्हा लोकांना अधिकात अधिक आणि एकदुसर्यापेक्षा जास्त धन प्राप्त करण्याच्या मोहाने बेसावध करून टाकले आहे इथपावेतो की (याच चिंतेत) तुम्ही थडग्यापर्यंत पोहचता, कदापि नाही, लवकरच तुम्हाला कळून येईल पुन्हा (ऐकून घ्या) कदापि नाही, लवकरच तुम्हाला कळून येईल, कदापि नाही, जर तुम्ही खात्रीचे ज्ञान म्हणून (या चालीच्या परिणामाला) जाणत असता (तर तुमचे वर्तन असे नसते). तुम्ही नरक पाहणारच! पुन्हा (ऐकून घ्या) तुम्ही अगदी खात्रीने तो पहाल. मग जरूर त्या दिवशी या देणग्यांसंबंधी तुम्हाला जाब विचारला जाईल. (१-८)
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2013
TOP