बृहत्संहिता - अध्याय २५
शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.
चंद्ररोहिणीयोगाचे जे फल सांगितले तेच स्वाती व पूर्वाषाढा या नक्षत्री चंद्र असता, आषाढशुक्लपक्षी पहावे. त्याहून यात जो विशेष तो मी सांगतो ॥१॥
आषाढशुक्लपक्षी जेव्हा स्वातीस चंद्र जाईल, त्यादिवशी रात्रीच्या प्रथमभागी वृष्टि होईल तर सर्वधान्यांची वृद्धि होईल. रात्रीच्या द्वितीयभागी वृष्टि होईल तर तीळ, मूग, उडीद ही धान्ये होतील. तृतीयभागी वृष्टि होईल तर ग्रैष्म (उन्हाळी धान्ये) होतील. शरद्दतूतील धान्ये होणार नाहीत ॥२॥

दिवसाच्या प्रथमभागी वृष्टि झाली तर उत्तम वृष्टि होते. द्वितीयभागी झाली तर उत्तम वृष्टि होते; परंतु कृमि, सर्प हे होतात. तृतीयभागी वृष्टि झाली तर मध्यमवृष्टि होते. स्वातियोगी रात्रंदिवस वृष्टि झाली तर, (यथाकाली) निर्दोषवृष्टि होते ॥३॥
चित्रानक्षत्राच्या समभागी उत्तरेकडे किंवा किंचित तिर्कस उत्तरेकडे जे नक्षत्र दिसते त्याला अपांवत्स असे म्हणतात. त्याजवळ चंद्र येईल तर तो स्वातियोग शुभ होतो ॥४॥
माघकृष्णसप्तमीस स्वातियोग असून त्यादिवशी बर्फ पडेल अथवा मोठा वारा सुटेल अ० सजलमेघ निरंतर गर्जना करील अ० विजांच्या मालांनीं व्याप्त आकाश होईल अ० चंद्र, सूर्य, नक्षत्रे दिसणार नाहीत तर त्यावर्षी लोक आनंदित होतील व सर्व धान्यांनी युक्त वर्षाकाल होईल असे जाणावे ॥५॥
तसेच फाल्गुन, चैत्र, वैशाख यांच्या कृष्णपक्षी स्वातियोगाची फले जाणावी; परंतु आषाढामध्ये विशेषेकरून जाणावी ॥६॥
॥ इतिबृहत्संहितायांस्वातियोगोनामपंचविंशोध्याय: ॥२५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 21, 2015
TOP