बृहत्संहिता - अध्याय ६२
शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.
तीन पाय पांचपांच नखांनीयुक्त व चवथा पुढला उजवा पाय सहा नखांनी युक्त, ओठ व नाकाचे अग्र ही तांबडी असा, सिंहासारखा पळणारा, जात असता भूमि हुंगणारा, केशयुक्त पुच्छ, वानरासारखी द्दष्टि, लांब व मृदु कर्ण, ही लक्षणे ज्या कुतर्याची असतील तो. आपल्या धन्याच्या गृहामध्ये लक्ष्मीते लवकरच पुष्ट करितो. (आपल्या धन्यास द्रव्यवान करतो) ॥१॥
जिच्या पायांस पांचपांच नखे व डाव्या पुढच्या पायांस सहा नखे अशी, मल्लिकाक्षी (डोळ्यांसभोवती पांढरी रेषा,) वाकडे पुच्छ, पिंगटवर्ण, लांब कानाची अशी जी कुत्री ती आपल्या पोषणकर्त्याचे राष्ट्र पालन कर्ते ॥२॥
॥ इतिबृहत्संहितायांश्वलक्षणंनामद्वाषष्टितमोध्याय: ॥६२॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2015
TOP