मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ६७

बृहत्संहिता - अध्याय ६७

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


मधासारखी दंतकांती ज्यांची असे, सुंदर विभक्त आहेत देह ज्यांचे असे, अतिस्थूल व अतिकृश नव्हत, सर्वकर्म सहन करणारे, सर्व शरीरावयव सारखे, धनुष्यासारखा आहे वंश (पाठीचे हाड) ज्यांचा असे, डुकरासारखे आहेत कटिभाग ज्यांचे, असे जे ह्त्ती, ते भद्रजातीचे भद्रसंज्ञक होत ॥१॥

ऊर, कक्षा, वलय, ही शिथिल; उदर लांब, कातडी व मानही मोठी, कुक्षि व पुच्छमूल ही स्थूल, सिंहासारखी द्दष्टि, ही मंदसंज्ञक हत्तीची लक्षणे होत ॥२॥

ओष्ठा, पुच्छ, शिश्न ही आखूड; पाय, कंठ, दात, शुंडा हे बारीक; नेत्र विस्तीर्ण, या चिन्हांनी युक्त जे गज ते भद्रसंज्ञक होत. तीनही चिन्हांनी जे मिश्रित ते मिश्रसं० गज होत ॥३॥

मृगसंज्ञकाची उंची ५ हात, पुच्छमूलापासून गंडस्थळापर्यंत लांबी ७ हात परिणाह (घेर) ८ हात. मंदसंज्ञकाची ६ हात उंची. ८ हात लांबी ९ हात घेर; भद्राची ७ हात उंची ९ हात लांबी, १० हात घेर; व स्कीर्ण (मिश्र संज्ञक ह्त्तीचे प्रमाणास नियम नाही ॥४॥

भद्रसं० हत्तीच्या मदाचा वर्ण हिरवा (पोपटी,) मंदसं वर्ण पिवळा, मृग सं० वर्ण काळा, संकीर्णसं० ह्त्तीच्या मदाचा वर्ण मिश्र (पिवळा काळा) अशा मदाच्या (दानोदकाच्या) रंगांवरून हत्तींच्या गती जाणाव्या ॥५॥

ओष्ठा, तालु, मुख ही तांबडी, कलविंक (चिमणापक्षी) सारखे नेत्र, स्निग्ध व अग्रे उंच असे दात, विस्तीर्ण व लांब असे मृद ज्याचे असे; धनुष्यासारखा उंच व विस्तीर्ण, निगूढ (शिथिलसंधि,) अति उंच नव्हे असा आहे वंश (पाठीचा कणा) ज्यांचा असे; कृश एककेशाने युक्त व कासवांच्या पाठीसारखी आहेत गंडस्थळे ज्यांची असे ॥६॥

कर्ण, हनवटी, नाभि, ललाट, गुहय ही विस्तीर्ण ज्यांची असे; कासवासारखी उन्नत १८ किंवा २० आहेत नखे ज्यांस, लांब तीन रेषांनी युक्त, वर्तुळ आहे शुंडा ज्यांची असे, सुंदर साहेत केश ज्याचे असे, सुगंधयुक्त आहे मद (गंडस्थळातील उदक) व शुंडेतील वायु ज्याचा असे ह्त्ती धन्य (शुभ) होत ॥७॥

लांब अंगुलि (शुंडेच्या शेवटास मांसाचा तुकडा असतो तो) व तांबडे आहे शुंडाग्र ज्याचे असे, सजल मेघाच्या शब्दासारखा शब्द ज्यांचा असे, मोठी, विस्तीर्ण, वाटोळी आहे मान ज्यांची असे हत्ती राजास शुभकारक होत ॥८॥

जे हत्ती मदरहित, फार अधिक किंवा फार कमी आहेत नखे व अवयव ज्यांचे असे, कुब्ज, वामन (ठेंगणे,) बकर्‍याच्या शिंगांसारख्या दाताचे, अंड व शुंडाचे अग्री कमलासारखे चिन्ह ही अद्दश्य ज्यांची असे, मलिन, नील व मिश्रितरंगाची तालु ज्यांची असे, स्वल्प आहेत दात किंवा मुखलोमे ज्यांची असे व बाहयदंतरहित, षंढ, असे हत्ती व याच ह्त्तीच्या लक्षणांनी युक्त व मोठया दातांची व मदयुक्त हत्तीण ही सर्व अशुभफल देणारी यास्तव राजाने दुसर्‍या देशास पाठवावी आपल्या देशात ठेवू नये (जो हत्ती गमन करीत असता, पाय मिळतात तो षंढ) ॥९॥१०॥


॥ इतिश्रीवराहमिहिरकृतौबृहत्संहितायांगजलक्षणंनामसप्तषष्टितमोध्याय: ॥६७॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP