मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ७०

बृहत्संहिता - अध्याय ७०

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


स्नेहयुक्त, कूर्मपृष्ठोन्नत, पुढे बारीक तांबडी नखे, समान, पुष्ट, सुंदर. गुप्त गोफे, मिळालेल्या अंगुली, कमलाच्या कांतीसारखे तल, असे जिचे पाय असतील तीते भूपतित्व इच्छिणाराने वरावी ॥१॥

मत्स्य, अंकुश, कमल, यव, वज्र, नांगर, तलवार, यांसारख्या रेषांनी चिन्हित, धर्मयुक्त नव्हेत, मृदु आहेत तल ज्यांचे असे पाय शुभ होत. केशरहित, शिराविरहित व वाटोळ्या पोटर्‍या, सारखे बारीक सांधे असे जानु, ॥२॥

घट्ट, ह्त्तीच्या शुंडेसारख्या रोमरहित अशा मांडया; पिंपळाच्या पानासारखी विस्तीर्ण योनि, श्रोणीललाट (कमरेच्या वरचा भाग) विस्तीर्ण व कूर्मपृष्ठोन्नत, योनीतला मणि गुप्त अशी स्त्री असता, बहुत लक्ष्मी प्राप्त होते ॥३॥

स्त्रियांचा नितंब (कटिप्रदेश) विस्तीर्ण, मांसल, गुरु, असा अ० कमरपट्टा धारण करतो. स्त्रियांची नाभि खोल, मोठी, प्रदक्षिण भोवर्‍याने युक्त अशी प्रशस्त होय ॥४॥

स्त्रीचा मध्यभाग (पोट) त्रिवलियुक्त व केशरहित असावा. स्तन वर्तुळ एकाशीएक, सारखे, कठीण, असावे. उर केशरहित, मृदु असावा. मान त्रिवलियुक्त असावी. म्ह० द्रव्य व सुख ही प्राप्त होतात ॥५॥

बंधुजीव (दुपारी तांबडी) पुष्पासारखा, मांसल, सुंदर, पक्वतोंडल्यासारखे रूप धारण करणारा, असा स्त्रियांचा ओष्ठ शुभ होय. कुंदाच्या कळीसारखे, सम (सारखे,) असे दात अ० पतिसुख व बहुत द्रव्य प्राप्त होते ॥६॥

चातुर्ययुक्त, प्रामाणिक, कोकिल व हंस यांसारखे रमणीय, दीन नव्हे असे भाषण बहुत सुख देते. समान, समपुटे, सुंदर अशी नाशिका शुभ होय. नीलकमलपत्राचे तेज हरणकरणारी (कमलपत्रासारखी) द्दष्टि (नेत्र) प्रशस्त होय ॥७॥

मिळालेल्या नाहीत, फार मोठया नव्हेत, आखूड, द्वितीयेच्या बालचंद्रासारख्या वक्र अशा भिवया शुभ होत. अर्धचंद्रासारखे, केशरहित, नीच नव्हे व उंचही नव्हे (सम) असे ललाट शुभ होय ॥८॥

कर्णद्वय योग्यपुष्ट, मृदु, तुल्य, संलग्न, असे शुब होय. स्निग्ध, नीलवर्ण, मृदु, कुरळ, एकरंध्रामध्ये एक असे केश सुखकारक होत. मस्तक सम शुभ होय ॥९॥

जलपात्र (झारी,) आसन, अश्व, हत्ती, रथ, बिल्ववृक्ष, यज्ञस्तंभ, बाण, माला, कुंडल, चवरी, अंकुश, यव, पर्वत, ध्वज, तोरण, मत्स्य, स्वस्तिक, वेदी, व्यजन, शंख, छत्र, कमल, ही चिन्हे (रेषारूप) पायांवर किंवा हस्ततलावर अथवा ह्र्दयावर असता, त्या राजस्त्रिया होतात ॥१०॥

अस्पष्ट आहे मणिबंध (हस्तमूल) जिचा अशी, नूतनकमलगर्भासारखे व बारीक, लांब आहेत अंगुलिपर्वे ज्यांची असे हात राजस्त्रियांचे होत. खोलगट नव्हे व अतिउंचही नव्हे व उत्तमरेषांनी युक्त हस्ततल अशी स्त्री चिरकाला पतियुक्त व पुत्र, सुख, द्रव्य यांचा उपभोग करिते ॥११॥

स्त्रीच्या हस्ततलामध्ये मणिबंधा (हस्तमूला) पासून उत्पन्न होऊन मध्यामांगुलीप्रत गेलेली रेषा अथवा पुरुषाच्या पादतलाच्याठाई ऊर्ध्वस्थित रेषा असेल अथवा अशा रेषा हस्ततली किंवा पादतली होतील तर त्या राज्यसुख देतील ॥१२॥

कनिष्ठिकामूलापासून उत्पन्न होऊन प्रदेशिनी (आंगठयाजवळची) व मध्यया यांच्यामध्ये जी रेषा गेली ती परमायु करते. ती प्रमाणाहून कमी असल्यास त्या परमायूपेक्षा कमी आयुष्य जाणावे (याची वर्षे कल्पनेने १०० वर्षांत कमी जाणावी ॥१३॥

अंगुष्ठमूलाच्याठाई पुत्रादि अपत्यांच्या रेषा होत. त्या मोठया अ० पुत्र व बारीक अ० कन्या होतात. त्यातही तुटलेल्या नव्हेत व लांब अशा दीर्घायूच्या व तुटलेल्या आणि बारीक अल्पायूंच्या होत ॥१४॥

पूर्वोक्तप्रकारे स्त्रियांचे शुभलक्षण सांगितले, याहून जे विपरीत ते अशुभ. होय. फारच अशुभ हले ती संक्षेपाने पुढे सांगतो. ॥१५॥

ज्या स्त्रीच्या पायांची कनिष्ठिका किंवा अनामिका भूमीस स्पर्श करीत नाही; अथवा प्रदेशिनी अंगुष्ठाच्या पुढे गेलेली असेल तर ती स्त्री व्यभिचारिणी किंवा पापिष्ठ होईल ॥१६॥

वर बद्ध अशा गोळ्यांनी युक्त, शिरायुक्त, केशयुक्त, फार मोठया अशा पोटर्‍या अशुभ. डावे फिरलेले केशांनी युक्त, निम्न (अध:स्थ,) अल्प अशी योनि अशुभ. घागरीसारखे पोट अशुभ. ही तीन दु:खकारक होत ॥१७॥
मान फार आखूड अ० निर्धनत्व, फार लांब अ० कुलक्षय, पृथूत्थ (चेपट) अ० स्त्री क्रूर होते. ॥१८॥

नेत्र तिरवे व पिंगटवर्ण ती दु:शीला व काळे असून चंचल नेत्र तीही दु:शीला होय. जी स्त्री हसली अ० गालांस खळग्या पडतात ती नि:संशय व्यभिचारिणी होय ॥१९॥

लांब ललाट, अ० दिराचा नाश, पोट लांब अ० सासर्‍याचा नाश, कुले लांब अ० पतीचा नाश, फार केशांनी युक्त वरचा ओठ अ० (मिशी आलेली) व फारच उंच अशी स्त्री पतीस शुभकारक नव्हे ॥२०॥

स्तन व कर्ण केशयुक्त, मलिन, अतिस्थूळ, दोनही सारखे नव्हेत असे असतील, ती दु:खी होते. मोठे, बाहेर आलेले व लांब, सारखे नाहीत असे दात दु:खकारक होतात. दातांजवळचे मांस काळे असेल तर ती स्त्री चोर होते ॥२१॥

राक्षस, लांडगा, कावळा, कंक (पक्षिवे०,) सर्प, घुबड यांसारख्या रेषांनी चिन्हित, मांसरहित, शिरायुक्त, अतुल्य असे ज्या स्त्रियांचे हस्त स्त्रियांचे हस्तत्या दु:खी व दरिद्री होतात ॥२२॥

ज्या स्त्रीचा वरचा ओष्ठ उंच व केशांची अग्रे रखरखीत ती कज्जेदलाल होते. बहुत करून विरूपस्त्रियांच्याठाई दोष राहतात. जिची आकृति (शरीर) सुंदर तिच्याठाई गुण राहतात ॥२३॥

गोफ्यांसहित पाय प्रथम दशाफल देतात असे सांगितले. गुडघ्यांसहित पोटर्‍या द्वितीय द० फले दे०. शिश्न, मांडया, वृषण ही तिसरे द० फल दे०. नाभि व कमर ही चतुर्थ द० फल दे० ॥२४॥

उदर पंचम द० फ० देते. स्तनयुक्त द्ददय सहावे द० फल देते. खांदा व जत्रु (बाहु व कंठ यांचा सांधा, सरी) ही सातवे द० फल दे०. ओष्ठ व मान ही आठवे दशाफल देतात ॥२५॥

नेत्र व भिवया ही नवम द० फल दे०. ललाट व शिर ही दशम द० फल शुभाशुभ देतात. (आयुष्याचे १० भाग करून जी वर्षे येतील त्यांमध्ये प्रथम पायांचे शुभ किंवा अशुभ फल येते. दुसर्‍या भागांत पोटर्‍यांचे येते. असे पुढे १० पर्यंत जाणावे.) ही चरणादि इंद्रिये, अशुभ अ० अशुभफल व शुभ अ० शुभफल जाणावे ॥२६॥


॥ इतिबृहत्संहितायांस्त्रीलक्षणंनामसप्ततितमोध्याय: ॥७०॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP