बृहत्संहिता - अध्याय ९१
शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.
वन्य (वनांतील) मृग (जनावरे) गावाचे सीमेवर उभी राहून, शब्द करतील, अथवा तेथूना जाताना शब्द करतील, अथवा तेथे येत असता शब्द करतील व ते दीप्त (प्रखर) असतील तर अनुक्रमाने वर्तमान, भूत, भविष्यकाळी भय होईल असे जाणावे. तसेच वन्यमृग गावांत किंवा नगरांत, फिरतील तर, शून्य (जनरहित) करतील ॥१॥
वन्यपशूंच्या मागून, ग्राम्यपशु शब्द करतील तर भय होईल. ग्राम्यपशूंच्या मागून वन्यपशु शब्द करतील तर शत्रु नगराचा रोध करतील. वन्य व प्ग्राम्यपशु सीमेवर येऊन, त्यांचे शब्दा नंतर (त्यामागून) वन्य व ग्राम्यपशु शब्द करतील तर ते नगर शत्रू जबरीने घेतील ॥२॥
वन्यपशु नगराच्या द्वारी राहील तर नगराचा शत्रू रोध करतील. नगरामध्ये प्रवेश करतील तर नाश होईल. प्रसून होईल तर मरण होईल. मरेल तर भय होईल. गृहात शिरेल तर गृहस्वामीस बंधन होईल ॥३॥
॥ इतिसर्वशाकुनेमृगचेष्टितंनामषष्टोध्याय: ॥६॥
॥ इतिबृहत्संहितायामेकनवतितमोध्याय ॥९१॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2015
TOP