बृहत्संहिता - अध्याय ३८
शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.
निबिडअंधकारतुल्य धुळीने पर्वत, नगरे, वृक्ष हे दिसेनासे झाले व सर्व दिशा आच्छादित झाल्या तर राजाचा वध होतो असे ऋषि म्हणतात ॥१॥
ज्या दिशेस धूमसमुदाय प्रथम उत्पन्न होईल किंवा ज्या दिशेकडे नाहीसा होईल त्या दिशेकडून सात दिवसांनी भय येते यात संशय नाही ॥२॥
धुळीचा समुदाय श्वेतवर्ण असेल तर प्रधान व लोक यांस पीडा व शीघ्र शास्त्रप्रकोप (युद्ध) होतो व अतिसंकुल सिद्धीही होते ॥३॥
धूळ सूर्योदयी पसरून एक किंवा दोन दिवस आकाशाते आच्छादित करील तर, मोठे कठीण भय होते ॥४॥
निरंतर संचयाने वाहणार असे रज एकरात्र राहील तर, मुख्य राजाचा नाश होईल व इतर चतुर राजांचे कल्याण होईल ॥५॥
ज्या राष्ट्रात दोन रात्री धूळ बहुत पसरेल तेथे शत्रुचक्राचे आगमन होईल असे जाणावे ॥६॥
तीन रात्री किंवा चाररात्री धूळ होईल तर, अन्न व रस यांचा नाश होतो. पाच रात्री रज होईल तर, राजांच्या सैन्यामध्ये क्षोभ होईल ॥७॥
केत्वादिकांच्या उदयी झालेले रज मोठे भय देणारे होते. हे रज शिशिरऋतु (माघ, फाल्गुन) यांवाचून अन्यऋतूत होईल तर मात्र त्याचे शुभाशुभ फल होते असे आचार्य म्हणतात ॥८॥
॥ इतिरजोलक्षणं ॥३८॥
N/A
References : N/A
Last Updated : February 21, 2015
TOP