अंगारितादिदिशा, शुभाशुभस्थान, व्यापार, दीप्तादिशब्द, वार, नक्षत्र, शिवादिमुहूर्त, होरा, बवादिकरण, लग्न, नवांश, देष्काणादि, चर, स्थिर, द्विभाव, शकुनांचे बलाबल, ही जाणून पक्ष्यादि शब्द जाणणाराने फळे सांगावी ॥१॥
संस्थित म्ह० प्रश्नकर्ते, यांची चर आणि स्थिर अशी प्रश्नकार्ये असतात. राजा, दूत, हेर, परदेश यासंबंधी उपद्रा, बंधुसुहृदादिकांचे येणे यासंबंधी प्रश्न असतात ॥२॥
उद्वंध (टांगलेले,) संयोग, सहभोजन, चोर, अग्नि, वृष्टि, विवाहादिउत्सव, अपत्य, मरन्न, कलह, भय यासंबंधी प्रश्न, स्थिरलग्नी, स्थिरनक्षत्री व स्थिरराशीस चंद्र असता, झाला तर तो स्थिरफल (याचे फल झाले आहे किंवा आजच होणार आहे) समजावा. चरलग्नी, चरनक्षत्री, चरराशीस चंद्र असता प्रश्न होईल तर तो चरफल, पुढे व्हावयाचे आहे, असे समजावे ॥३॥
स्थिरप्रदेश, पाषाण, गृह, देवालय, भूमि, जलसमीपभाग यास्थानी शकुन झाले तर, कार्ये स्थिर (झाली किंवा आज होतील) असे सांगावे. चलप्रदेशादिकांच्याठाई शकुन झाले तर कार्य पुढे होईल असे सांगावे ॥४॥
जललग्न, जलनक्षत्र, जलमुहूर्त, जलदिशा (पश्चिम,) व अमावास्या पूर्णिमा यांच्याठाई स्थित व प्रदीप्त असे जे शकुन ते सर्व वृष्टि करणारे होत. उदकचारी शांतही शकुन वृष्टि करतो ॥५॥
आग्नेयीदिशा, क्रूरग्रहांचे लग्न, आग्नेयमुहूर्त, कृत्तिकानक्षत्र, उग्रदेस यांच्याठाई अर्कप्रदीप्त शकुन झालातर अग्निभय होते. कल्याणी, शनीची लग्ने (मकर कुंभ,) काटयांचावृक्ष,पत्ररहितवृक्ष, वल्ली यांच्याठाई शकुन झाला तर चोरी होईल ॥६॥
गावात झालेला, शब्द व चेष्टा यांनी दीप्त, उग्रशब्द करणार, काट्यांच्या झाडावर राहलेला, मंगळाच्या लग्नी (मेष, वृश्चिक) झालेला, निऋतीस स्थित असा शकुन संमुख पाहिला तर कलह होतो ॥७॥
चंद्राचेलग्नी (कर्क) शुक्राचे राशीस व नवांशी शकुन आग्येयादि विदिशांस राहून अधोमुख शब्द करील व दीप्त असेल तर स्त्रीचे ग्रहण करील. ज्या विदिशेस जी योनी (उत्पत्ति) सांगितली तिचे ग्रहण (संयोग) करतो ॥८॥
पुराशि, विषम लग्न व विषम तिथि यांच्याठाई प्रदीप्तदिशेस राहणारा शकुन पुरुषाख्य होय. तसा झाला तर पुरुषांचे संग्रहण (संयोग) होईल. असे सांगावे. मिश्र असल्यास नपुंसकयोग होईल ॥९॥
असेच सूर्याचाराशि (सिंह) त्याचा नवांश व तात्कालिक लग्न अ० अथवा लग्नी सूर्य अ० दीप्तशकुन होईल तर मुख्यपुरुषाचे प्रवासाचे हेच कारण होय (प्रवास होईल) ॥१०॥
सर्वकार्यांच्या प्रारंभी सूर्ययुक्त राशीपासून लग्न मोजावे १ संपून, २ विषत् इ० जे येईल त्याप्रमाणे संपत् किंवा विपत असे लग्नाचे फल सांगावे ॥११॥
प्रश्नसमयी जे लग्न त्यापासून सूर्य १२ व्या लग्नी असेल. तर ज्याचा संयोग होईल तो उजव्या डोळ्याने काणा असेल. १२ व्या स्थानी चंद्र अ० डाव्या डोळ्याने काणा असेल. चंद्रसूर्य दोघेही १२ वे असतील तर अंधच असेल. प्रश्नलग्नी सूर्य असेल व तो पापग्रहांनी द्दष्ट असेल तर अंध असेल. स्वराशीस (सिंहास) सूर्य असेल तर कर्णहीन (बधिर) किंवा जड (मूर्ख) असेल ॥१२॥
प्रश्नलग्नाप्रासून ६ वा पापग्रह व त्यावर पापग्रहाची हाष्टि असेल. तर षष्ठ स्थानस्थराशि, कालपुरूषाच्या ज्या अंगी असेल, त्याअंगी व्रण असेल. जे मी जन्मकाली चिन्ह, रूप सांगितले ते येथेही पहावे ॥१३॥
चरलग्नी चरनवांश असेल तर येणाराचे किंवा प्रश्नकर्त्याचे दोन अक्षरांचे नाव आहे असे सांगावे. स्थिरलग्नी स्थिरनवांश असेल तर ४ अक्षरांचे नाव आहे. द्विस्वभावलग्नी द्विस्वभाव नवांश असेल तर दोन नावे आहेत पहिले तीन अक्षरांचे व दुसरे पांच अक्षरांचे असे सांगावे ॥१४॥
कादिवर्ण कुज, शुक्र, बुध, गुरु, शनि यांचे अनुक्रमाने सांगितले. म्ह० क ख ग घ ङ यांचा मंगळ; च छ ज झ ञ यांचा शुक्र; ट ट ड ढण यांचा बुध: त थ द ध न यांचा गुरु; प फ ब भ म यांचा शनि; य र ल व श ष स ह या आठ वर्णांचा चंद्र व अकारादि १६ स्वरांचा सूर्य स्वामी होय ॥१५॥
सूर्यापासून अनुक्रमाने अग्नि, उदक, कुमार, विष्णु, इंद्र, इंद्राणी, ब्रम्हा या सात देवता सात ग्रहांच्या होत. सूर्यादि ग्रहयोगाचा स्वबुद्धीने विचार करून त्र्यादिवर्णांची नावे योजावी ॥१६॥
चंद्र शिशु, भौम ६ वर्षांपर्यंत, बुध व्रतस्थ १६ पर्यंत, शुक्र ३० वर्षापर्यंत, गुरु ५० वर्षाप०, शनि ८० वर्षांपर्यंत अशी त्यांची वये होत प्रश्रकाली जो ग्रह असेल त्याचे वय सांगावे ॥१७॥
॥ इतिशाकुनोत्तराध्याय: ॥
॥ इतिश्रीवराहमिहिरकृतौबृहत्संहितायांषण्णवतितमोध्याय: ॥९६॥