बृहत्संहिता - अध्याय ३९
शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.
वायूने वायूचे ताडन होऊन जेव्हा आकाशापासून भूमीप्रत पडतो; तेव्हा निर्घात (मोठाशब्द) होतो तो निर्घात, सूर्याभिमुख पक्षिशब्दांनीयुक्त असेल तर अशुभ होय ॥१॥
सूर्योदयी निर्घात होईल तर, अधिकारी, राजा, धनवान, योद्धा, स्त्री, व्यापारी, वेश्या यांचा नाश होतो. दिवसाच्या प्रथमप्रहरी निर्घात होईल तर, शेळ्या, मेंढया, शूद्र, नागरिकजन यांचा नाश ॥२॥
मध्यायन्हपर्य़ंत म्ह. दुसर्या प्रहरी निर्घात झाला तर, राजाचे सेवक, ब्राम्हाण यास पीडा. तिसर्या प्रहरी वैश्य, मेघ यास पीडा. चतुर्थप्रहरी चोरांस पीडा ॥३॥
अस्तमानी नीचास पीडा. रात्री प्रथमप्रहरी धान्यास पीडा. द्वितीयप्रहरी पिशाचसमुदायांस पीडा ॥४॥
तृतीयप्रहरी अश्व व गज यांचा नाश. चतुर्थप्रहरी यायी (जयेच्छु) यांचा नाश होतो. निर्घाताचा भयंकर व फुकटया भांडयाच्या शब्दासारखा शब्द ज्या दिशेस जाईल, त्यादिशेचा नाश होतो ॥५॥
॥ इतिबृहत्संहितायांनिर्घातलक्षणंनामैकोनचत्वारिंशोध्याय: ॥३९॥
N/A
References : N/A
Last Updated : February 21, 2015
TOP