बृहत्संहिता - अध्याय ३६
शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.
गंधर्वनगर उत्तरदिशेकडे असेल तर पुरोहितास अशुभ. पूर्वेस दिसेल तर राजास अशुभ. दक्षिणेस दि० तर सेनापतीस अशुभ. पश्चिमेस दि० तर युवराजास अशुभ होय. गंधर्वनगराचा शुभ्रवर्ण असेल तर ब्राम्हाणांचा नाश. रक्तवर्ण अ० क्षत्रियांचा नाश. पीतवर्ण अ० तर वैश्यांचा नाश. कृष्णवर्ण अ० तर शूद्रांचा नाश होतो ॥१॥
गंधर्वनगर उत्तरेस दिसले तर नगरसंबंधी राजाचा जय होतो. ईशान्यादि विदिशांस दिसेल तर हीनजातीचा नाश. शांतदिशेसे तोरणसहित दिसेल तर राजाचा जय होतो ॥२॥
एककाली सर्वदिशांस उत्पन्न झालेले व प्रतिदिवशी दिसणारे गंधर्वनगर राजा व देश यांस भय देते. धूम, अग्नि, इंद्रधनुष्य यांसारख्या कांतीचे गंधर्वनगर, चोर व अरण्यवासी यांचा नाश करिते ॥३॥
द्दष्टिगोचर झालेले गंधर्वनगर पांडुरवर्ण असेल तर, अशनिसंज्ञक विद्युत्पात व वायु करील. दीप्तदिशेकडे दिसेल तर, राजास मृत्यु होतो. सैन्याचे वामभागी दिसेल तर, शत्रुभय व सव्यभागी दिसेल तर जय, हे होतात ॥४॥
बहुतवर्ण व बहुत आकारांचे, पताका, ध्वज, तोरण यांही युक्त असे गंधर्वनगर आकाशात दिसेल तर, हत्ती, मनुष्य, घोडे यांचे बहुत रक्त भूमि युद्धामध्ये प्राशन करिते. म्हणजे बहुत युद्धे होऊन हत्ती, मनुष्य घोडे यांचा नाश होतो ॥५॥
॥ इतिबृहत्संहितायांगंधर्वनगरलक्षणंनामषट्त्रिंशोध्याय: ॥३६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 21, 2015
TOP