मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय १००

बृहत्संहिता - अध्याय १००

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


रोहिणी, उत्तरा, उ०षा० उ०भा०, रेवती, मृगशीर्ष, मूळ, अनुराधा, मघा, हस्त, स्वाती या नक्षत्री; कन्या, तूळ, मिथुन या लग्नी; विवाह करावा. लग्नापासून ७।८।१२ या स्थानांवाचून शुभग्रह असता,  ११।२।३ यास स्थानी चंद्र अ०, ३।११६।८ या स्थानी पापग्रह अ०, विवाह करावा. शुक्र ६ वा व भौम ८ या शुभ नव्हे ॥१॥

वधूचे राशीपासून वराची व वराचे राशीपासून वधूची राशि, दुसरी, नववी, व आठवी नसावी. सूर्यबळ असता, सूर्य, भौम, शनि, शुक्र यांनीयुक्त चंद्र नसता व पापग्रहांच्यामध्ये चंद्र नसता, व्यतिपात, वैधृति, कल्याणी, रिक्तातिथि, ही सोडून पापग्रहांचे वार, दक्षिणायन, चैत्र, पौष यांवाचून; लग्न व नवमांश हे द्विपदराशीचे असता विवाह करावा ॥२॥


॥ इतिश्रीवरा०बृहत्संहितायांविवाहनक्षत्रलग्ननिर्णयोनामशततमोध्याय: ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP