बृहत्संहिता - अध्याय ९२
शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.
गाई, दीन झाल्या असत राजाचे अनिष्ट होते. पायांनी भूमीते विदारण करतील तर रोग होतील. अश्रूने पूर्वनयन अ० धन्यास मृत्यु होतो. भ्याल्याहोत्सात्या शब्द करतील तर चोरभय होईल ॥१॥
गाय कारणावाचून (वासरू, पाणी, गवत या वाचून) शब्द करील तर अनर्थ होईल. रात्रीस शब्द करील तर कल्याण होईल. गाई मक्षिकांनी अथवा कुत्र्यांनी अत्यंत रोधिली तर, शीघ्र बहुत वृष्टिकृत उपद्रव होतील ॥२॥
गाई हंबरत घरात येतील तर आपल्या गोष्ठाची वृद्धि करतील, गाई आर्द्रांग, आनंदित, आनंदाने आंगावर केश उभारलेले अशा असता शुभ होत. म्हशीचेही गाईंसारखेच शुभाशुभफल जाणावे ॥३॥
॥ इतिसर्वसाकुनेगवेगितंनामसप्तमोध्याय: ॥७॥
॥ इतिवराह०बृहत्संहितायांद्वानवतितमोध्याय: ॥९२॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2015
TOP