मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ६९

बृहत्संहिता - अध्याय ६९

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


भौमादि पाच ग्रह बलिष्ठ, स्वगृही, स्वोच्ची, केंद्री असता, पांच पुरुष उत्तम होतात. ते सांगतो ॥१॥

पूर्वोक्तस्थानी बृहस्पति बलिष्ठ अ० हंसस० पुरुष होतो. शनि अ० शशसंज्ञक, भौम अ० रूचाक सं० बुध अ० भद्रसं०, शुक्र अ० मालव्यसंज्ञक पुरुष होतो ॥२॥

सूर्य बलिष्ठ अ० सत्त्वादि गुण परिपूर्ण होतात. देहगुण व मानसगुण चंद्रबलाने होतात. ज्या राशीचे होरा द्रेष्काणादि भेदयुक्त सूर्यचंद्र असतील त्या राशिभेदस्वामीच्या लक्षणांचा तो पुरुष होतो ॥३॥

त्या स्वामीच्या स्नाय्वादिधातु, महाभूतांच्या प्रकृति (महीस्वभाव इत्यादि अ० ६८ श्लोक० १०९।११०,) कांति, (अ० ६८ श्लोक ८९,) वर्ण, सत्त्व, रूपादिकाही समान होतात (जन्मकाली सबल सूर्यचंद्र ज्या ग्रहाच्या गृहहोरादि षडवर्गी असतील त्या ग्रहाच्या धात्वादि प्रकृतियुक्त पुरुष होतो.) जन्मकाली निर्बल सूर्यचंद्रयुक्त गृहहोरादि षडवर्गी असतील त्या ग्रहाच्या धात्वादि प्रकृतियुक्त पुरुष होतो.) जन्मकाली निर्बल सूर्यचंद्रयुक्त गृहहोरादि षडवर्ग असता लक्षणांनी संकीर्ण (मिश्र) होतात ॥४॥

सत्त्व (धैर्य) भौमापासून होते. शरीराचे गुरुत्व बुधापासून, शब्द गुरूपासून, स्नेह (निर्मलत्व) शुक्रापासून, वर्ण शनैश्वरापासून ही होतात. या ग्रहांच्या सबलत्वाने चांगले व निर्बलत्वाने वाईट असे होतात ॥५॥

संकीर्ण (मिश्र) जे ते राजे होत नाहीत. त्या ग्रहाच्या दशेमध्ये सुखी होतात. शत्रुगृह, नीच, उच्च यांपासून च्युत जे शुभ व पापग्रह यांच्या द्दष्टीने त्या पुरुषांचा भेद म्ह० सुखदु:खादिमिश्रत्व होते ॥६॥

हंससंज्ञक पुरुषाची, (वावाची) लांबी ९६ अंगुले व उंचीही ९६ अंगुलेच होय. शश, रुचक, भद्र, मालव्य, संज्ञक पुरुषांची रुंदी व उंची तीन तीन अंगुले अनुक्रमाने अधिक जाणावी. म्ह० ९९ शश, १०२ रुचक, १०५ भद्र, १०६ मालव्य अशी जाणावी ॥७॥

सत्त्वगुणाधिक पुरुषास दया, स्थिरचित्त, सत्यभाषन, सरळस्वभाव, ब्राम्हाण व देव यांची भक्ति, हे गुण होतात. रजोगुण अधिक अ० काव्य, नृत्यगीतादिकला, यज्ञ, स्त्री, यांच्याठाई आसक्तचित्त व अतिशूर असा होतो ॥८॥

तमोगुण अधिक अ० लोकांस ठकविणे, मूर्ख, आळशी, क्रोधिष्ठ, अतिनिद्र, (निद्राळु) असा होतो. सत्त्वरजतम हे तिनही गुण मिश्रित अ० पूर्वोक्त स्वभाव मिश्र होतात. त्यांचे भेद सात होतात. (१ सत्त्व, २ रज, ३तम, ४ सत्त्वरजसी, ५ रजस्तमसी, ६ सत्त्वतमसी, ७ सत्त्वरजस्तमांसि असे सात प्रकार राशिभेदास्तव व संकीर्णत्वास्तव होतात) ॥९॥

हत्तीच्या शुंडेसारखे बाहुद्वय, गुडघ्यापर्य़ंत लांब हस्त, मांसांनी परिपूर्ण अंगाच्या संधि, सम व तेजस्वी शरीर, मध्यभागी कृश, हनुवटीपासून ललाटापर्यंत १३ अंगुले मुख, कर्णविवरही तिरकस त्र्यंगुलोन (तीन अंगुलात काही कमी) म्ह० हनुवटीपासून कर्णविवर १० अंगुले, स्वच्छनेत्र, सुंदर गाल, सारखे व पांढरे दात, फार मोठा नाही अधरोष्ठ, असा मालव्यसंज्ञक पुरुष होय ॥१०॥

सुंदरबुद्धि, पारियात्र पर्वतावर राहणारा, स्वपराक्रमाने संपादितद्रव्य असा मालव्यसंज्ञक पुरुष, राजा होऊन माळवा, भरु, कच्छ, सुराष्ट्र, लाट, सिंधुदेश इत्यादिकांते रक्षण करतो ॥११॥

७० वर्षांचा, हा मालव्य, तप करून पुण्यभूमीच्याठाई प्राण सोडील. हे उत्तमप्रकारे मालव्यपुरुषाचे लक्षण सांगितले. भद्रादिपुरुषांची लक्षणे पुढे सांगतो ॥१२॥

पुष्ट, सारखे, वाटोळे, लांब असे आहेत बाहु ज्याचे, वावाइतकी आहे उंची ज्याची, मृदु, बारीक, दाट, अशा रोमांनी (अंगांवरील केशांनी) युक्त आहेत गाल ज्याचे, असा पुरुष भद्रसंज्ञक होतो ॥१३॥

त्वचा बळकट, रेत बहुत,  विस्तीर्ण व पुष्ट व पुष्ट वक्षस्थळ, सत्त्वगुणाधिक, व्याघ्रासारखे मुख, स्थिरबुद्धि, दयायुक्त, धर्मरत, उपकर जाणणारा, मंदगति, बहुत शास्त्रे जाणणारा, ॥१४॥

ज्ञानी, द्दढदेह, उत्तम आहेत ललाट व शंख ज्याचे, नृत्यादि कला जाणणारा, धैर्यवान, उत्तम कुक्षि ज्याची, कमलगर्भासारखे तेजस्वी होत व पाय ज्याचे, योगाभ्यासी, सुंदरनाक, सारख्या व मिळालेल्या भिवया ज्याच्या असा  भद्रपुरुष होय ॥१५॥

नवीन उदकाने सिंचित भूमि,  तमालपत्र, कुंकुम, हत्तीचे मदोदक, धूप, यांसारखा गंध; एका रोमरंध्रामध्ये एक असे, काळे, आकुंचिता आहेत केश ज्याचे, घोडा व हत्ती यांसारखे गुप्त आहे शिश्न ज्याचे असा भद्रपुरुष होय ॥१६॥

नांगर, मुसल, गदा, तरवार, शंख, चक्र, हत्ती, मगर, कमल, गाडा यांसारख्या रेषांनी युक्त आहेत पाय व हात ज्याचे, ऐश्वर्य (संपत्ति) लोक उपभोग करितात, स्वजनाची क्षमा करीत नाही, स्वाधीन आहे बुद्धि ज्याची, असा भद्रपुरुष होय ॥१७॥

सहा अंगुले कमी नव्वद म्ह० ८४ अंगुले उंच दोनहजार पले वजन, असा भद्रसंज्ञक पुरुष मध्यदेशाचा राज होईल. जर तोच पुरुष १०५ अंगुले उंच असेल तर सर्वपृथ्वीचा राजा होईल. (सातव्या श्लोकात त्र्यादिपुष्ट सांगितले त्याप्रमाणे) ॥१८॥

पराक्रमाने मिळवलेल्या पृथ्वीचा उपभोग घेऊन ८० वर्षांनंतर पुण्यक्षेत्री प्राणत्याग करून भद्रसंज्ञक महापुरुष स्वर्गाप्रत जातो ॥१९॥

थोडे वरदातांचा, बारीक दात व नखांचा, नेत्रपाती अधिक ज्याची, शीघ्रगामी, शब्दविद्या, गौरिकादिधातु, क्रयविक्रयादि व्यापार यांच्याठाई तत्पर, पुष्टगालांचा, परकार्यविमुख, सेनापति, मैथुनप्रिय, लोकांच्या स्त्रियांच्याठाई आसक्त, चंचलबुद्धि, युद्धशूर, मातृभक्त, वने, पर्वत, नद्या, किल्ले यांच्याठाई आसक्तचित्त; असा शशसं० महापुरुष होय ॥२०॥

हा शशसंज्ञक ९२ अंगुळे उंच, शंकायुक्त व्यापारकर्ता, शत्रूचे छिद्र जाणणारा, मज्जासार, स्थिरप्रचार (चंचल नव्हे) फार स्थूल नाही, असा होय ॥२१॥

मध्यभागी कृश, ढाल, तलवार, वीणा, मंचल, माळ, मृदंग यांसारख्या व शूलासारख्या ऊर्ध्वगत रेषा पायांवर किंवा हातांवर असा पु० शशसंज्ञक होय ॥२२॥

शश, गुहावासी लोकांचा राजा किंवा मांडलिक राजा होतो. कुल्यांचा स्राव व शूलरोगाच्या पीडेने पीडितशरीर असा ७० वर्षांनी मरतो ॥२३॥

आरक्त, पुष्टगाल, उंचनाक, सुवर्णासारखे असे मुख, वाटोळे मस्तक, मधासारख्या वर्णाचे डोळे, सर्व नखे तांबडी, माला, अंकुश, शंख, मत्स्यद्वय, यज्ञांग (वेदीस्रुवादि,) कुंभ, कमल या चिन्हांनी चिन्हित, हंसासारखा मधुरशब्द, सुंदर पाय, स्वच्छ इंद्रिये असा हंससंज्ञक महापुरुष होय ॥२४॥

हंसाची क्रीडा उदकामध्ये, रेत अधिक, वजन १६०० पले, उंची ९६ अंगुळे पंडितांनी सांगितली ॥२५॥

खस, शूरसेन, गाम्धार, गंगा व यमुना यांचा मध्यदेश यांचा उपभोग हंसमहापुरुष करितो. नव्वद वर्षे राज्य करून वनामध्ये मृत्यु पावतो ॥२६॥

सुंदर भिवया व केस, तांबडा व काळा वर्ण, त्रिवलियुक्त मान, थोडेसे लांब तोंड, शूर, क्रोधी, श्रेष्ठ, मसलती चोरांचा राजा, श्रम करणारा, रुचकसं० महापुरुष होय ॥२७॥

रुचकाचे जितके लांब मुख तितकीच उदरमध्याची विपुलता (रुंदी,) सूक्ष्मत्वचा, रक्त व मांस ही बळकट, शत्रु मारणारा, साहसकर्माने कार्य सिद्ध करणारा, रुचकसं० महापुरुष होय ॥२८॥

खटवांग (आयुधविशेष,) वीणा, वृषभ, धनुष्य, वज्र, शक्ति (सैती) चंद्र, त्रिशूल यांसारख्या रेषांनी युक्त हात व पाय, गुरु, ब्राम्हाण, देव यांचा भक्त, १०० अंगुले उंच, सहस्र पले वजन रुचकसं० होय ॥२९॥

मंत्रप्रयोग व जारणमारणादि यांच्याठाई कुशल, गुडघे व पोटर्‍या बारीक, विंध्य व सहयपर्वत आणि उज्जयनी यांचे राज्य करून ७० वर्षे झाल्यावर रुचकमहापुरुष राजा शस्त्राने अथवा अग्नीने मृत्यु पावतो ॥३०॥

पूर्वोक्त पांच महापुरुषांहून दुसरे वामनक, जघन्य, कुब्ज, मंडलक, सामी, हे पाच पुरुष पूर्वोक्त राजांचे अनुचरा (सुहृत) संकीर्ण (मिश्र) संज्ञक होत. त्यांची लक्षणे सांगतो ॥३१॥

पूर्णावयव, वक्रपाठ, मांडया, मध्यभाग, कांख यांमध्ये थोडासा वाकडा, कीर्तिमान, भद्रसं० राजाचा सेवक; वृद्धिंगत, दानशील, वासुदेवाचा भक्त, वामनपुरुष होय ॥३२॥

मालव्यसं० महापुरुषाची सेवा करणारा, अर्धचंद्रासारखे कान, सुंदर अंगसंधि, अधिक रेत, पिशुन, कवि, कठीणत्वचा, करांगुली मोठया ॥३३॥

मालव्यसं० महापुरुषाची सेवा करणारा, अर्धचंद्रासारखे कान, सुंदर अंगसंधि, अधिक रेत, पिशुन, कवि, कठीणत्वचा, करांगुली मोठया ॥३३॥

क्रोधी, धनवान, अल्पबुद्धि, प्रसिद्ध, लोहितवर्ण त्वचा, हसणारा, उर, चरण, हस्त, यावर तरवार, शक्ति, पाश, फरश, यांसारख्या रेषा, असा जघन्यनामक पुरुष होय ॥३४॥

कुब्जनामक, अधोभागी संपूर्णांग, पूर्वभागी (वरच्या अंगी) किंचित क्षीण व नत (अस्तष्ट); हंससं० ची सेवा करणारा, नास्तिक, द्रव्ययुक्त, विद्वान, शूर, पिशुन, उपकार जाणणारा ॥३५॥

नृत्यादि कला जाणणारा, कलहप्रिय, बहुत चाकर, स्त्रीजित, लोकांची पूजा करून अकस्मात सोडणारा, निरंतर उद्योगी, कुभ्ज होया ॥३६॥

मंडलक पुरुष रुचकाचा सेवक, आभिचारिक कर्मे करणारा, कुशल, कृत्या (आभिचारिक मंत्रांनी उत्पन्न झालेली स्त्री,) वेताल इ० कर्मांच्याठाई व विद्यांमध्ये तत्पर ॥३७॥

वृद्धसद्दशशरीर, कठीण व रूक्ष असे केश, शत्रूंच्या नाशाविषयी कुशल, ब्राम्हाण, देव, यज्ञ, योगाभ्यास यांच्याठाई आसक्तबुद्धि, स्त्रीजित,बुद्धिमान, मंडलक होय ॥३८॥

सामिस०, फार विरूपदेह, शश याचा सेवक, दुर्भाग्य, दानशील, मोठया कार्यांचा आरंभ करून समाप्ति  करणारा, सत्त्वादि गुणांनी शशासारखा (श्लो० २०) ॥३९॥

या श्लोकाचा अर्थ पूर्वाध्यायांती सांगितला ॥४०॥


॥ इतिवराहमिहिरकृतौबृहत्संहितायांपंचमहापुरुषलक्षणंनामैकोनसप्ततितमोध्याय: ॥६९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP