बृहत्संहिता - अध्याय ६४
शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.
स्फटिकमणि व रूपे यांच्या वर्णाचा, नीलवर्णरेषांनी चित्रित, कलशासारख्या शरीराचा, चारुवंश (फार उंच नव्हे अशा पाठीचा) असा; अथवा तांबडया शरीराचा, महुरीसारख्या पांढर्या बिंदूंनी युक्त असा कासव गृहामध्ये असेल तर सर्व राजांचे महत्त्व करतो (राजाधिराजा करतो) ॥१॥
काजळ व भ्रमर यांसारखा काळ्या शरीराचा, बिंदूंनी चित्रित, पूर्णावयव सर्पासारख्या तोंडाचा, मोठया गळ्याचा असा जो कासव तोडी राजांची राष्ट्रवृद्धि करणारा होतो ॥२॥
वैडूर्यमण्याच्या कांतीचा (काळा,) स्थूलकंठ, त्रिकोणाकृति, गुप्तच्छिद्र, सुंदर पृष्ठभाग असाही कासव असा कासव राजांनी शुभार्थ क्रीडावापी (पुष्करिणी) अथवा उदकपूर्ण मृन्मय भांडयामध्ये ठेवावा ॥३॥
॥ इतिबृहत्संहितायांकूर्मलक्षणंनामचतु:षष्टितमोध्याय: ॥६४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2015
TOP