पराशरऋषि बृहद्रथनामक स्वशिष्याकारणे जे गोलक्षण सांगता झाला, त्यावरून मी हा त्याचा संक्षेप, गाई सर्व जरी शुभलक्षण आहेत तथापि शास्त्राप्रमाणे सांगतो ॥१॥
स्रवणारे व अस्वच्छ आणि रूक्ष असे आहेत नेत्र ज्यांचे अशा, उंदरांसारख्या डोळ्यांच्या अशा गाई शुभद नव्हत. हालणारी व चेपलेली (आखूड वगैरे) आहेत शिंगे ज्यांची अशा, काळ्या तांबडया व गाढवाच्या वर्णाच्या ॥२॥
१०।७।४ दातांच्या, लांब तोंडाच्या व शिंगांवाचून, पाठीस खळगा अशा, आखूड व स्थूल मानेच्याअ, यवमध्य (पोट मात्र मोठे असून मागे व पुढे बारीक) पसरलेल्या खुरांच्या ॥३॥
काळी व अति लांब अशा जिव्हेच्या, फार बारीक व फार मोठे गुल्फ (खुरक्या) यांच्या, मोठया कोळ्याच्या, बारीक देहाच्या, कमी किंवा अधिक अवयवांच्या अशा गाई शुभ नव्हत ॥४॥
वृषभ (आंडील बैल) ही असा (वरील लक्ष्मणयुक्त) शुभ नव्हे. मोठा व लांब वृषण (आंड,) शिरांनी व्याप्त उर, मोठया शिरांनी व्याप्त गाल ज्याचे, त्रिस्थान मेहते (मूत्रपुरीष एककाली करणारा व डोळ्यांचे शिश्राने म्हणजे मूत्राने मूत्राने सिंचन करणारा) ॥५॥
मांजरासारख्या डोळ्यांचा, काळा, करडा वर्णाचा, असा वृषभ शुभ नव्हे; परंतु ब्राम्हाणास इष्ट होय. ओष्ठ, तालु, जिव्हा ही काळी ज्याची असा व त्रास करणारा असा वृषभ कळपाचा घातकारक होतो ॥६॥
शकृत् (शेणपो,) मणि (शिश्न,) शिंग, ही ज्याची मोठी असा, पांढर्या पोटाचा, काही काळा व काही पांढरा अशा रंगाचा, असा वृषभ आपल्या घरात झालेला असला तथापि त्याचा त्याग करावा; कारण तो वृक्षभ कळपाचा नाशकाक्रक होय ॥७॥
श्याम (काळा) वर्ण पुष्पांनी युक्त अवयवांचा, भस्मवर्ण व तांबडा, मांजराच्या डोळ्यांसारख्या डोळ्यांचा वृषभ घेतला असता, ब्राम्हाणांचेही कल्याण होत नाही ॥८॥
ज्या वृषभांवर ओझे घातले असता, चिखलातून पाय काढावे, असे पाय उचलतात ते, बारीक मानेचे, भित्र्या डोळ्यांचे, पाठ लपलेले, असे वृषभ ओझ्याचे उपयोगी नाहीत ॥९॥
मृदु, मिळालेले व तांबडे असे आहेत ओष्ठ ज्यांचे असे, बारीक कुल्याचे, तालु व जिव्हा ज्यांच्या तांबडया असे, बारीक, आखूड व उंच कानांचे, सुंदर कुशीचे, सरळ जंघाचे ॥१०॥
ईषत् ताम्र व मिळालेल्या खुरांचे, अत्यंत द्दढ वक्षस्थळाचे, मोठया कोळ्याने युक्त, स्निग्ध, मृदु व पातळ अशी आहेत त्वचा (कातडी) व केश ज्यांचे असे, तांबडी व बारीक अशी आहेत शिंगे ज्यांची असे ॥११॥
बारीक व भूमीला स्पर्श करणारे आहे पुच्छ ज्याम्चे असे, तांबडे आहेत डोळ्यांचे प्रांतभाग ज्यांचे असे, फार उंच, सिंहासारखा आहे स्कंध ज्यांचा असे, बारीक व थोडकी आहे कंबल (मानेखालील सांखळी) ज्यांची असे, चांगली आहे गति ज्यांची असे वृषभ शुभ होत ॥१२॥
डाव्या बाजूस डावे फिरलेले व उजवे बाजूस उजवे फिरलेले असे केश ज्यांचे असे व बकर्यासरख्या जंघांचे(पोटर्यांचे) बैल शुभ होत ॥१३॥
श्यामवर्ण, हंसाचे डोळ्याप्र०, पाण्याचे बोबडयाप्रमाणे ज्यांचे डोळ्यांचे भवईंस जाडे केस आहेत असे, खुरांचे (गेळांचे) मागचे भाग न फुटले आहेत ज्याचे, असे सर्व बैल ओझे नेण्यास योग्य होत ॥१४॥
नाकावर वळ्या पड्लेला, मांजरासारख्या मुखाचा, उजव्या आंगास पांधरा, श्वेतकमल व नीलकमल व लाख यांच्या रंगाचा, सुंदरपुच्छकेशांचा, घोडयासारख्या वेगाचा (शीघ्रगति,) लांब अंडयुक्त, बकर्यासारख्या पोटाचा, वक्षण (अंडामागील जंघा) व क्रोड (अग्रजंघांतर) ही संक्षिप्त (लहान) आहेत ज्यांची असा, बैल भार घेण्यास, मार्ग चालण्यास, घोडयासारख्या वेगाचा व शुभफलद जाणावा ॥१५॥१६॥
पांढरा, पिंगटनेत्र, तांबडी शिंगे व डोळे, मोठे मुख, या लक्षणांचा बैल हंसनामक, कळप वाढिवणारा, शुभफलदायक सांगितला ॥१७॥
भूमीला स्पर्श करणारे आहेत पुच्छाचे केश ज्याचे असा, अल्प ताम्रवर्ण आहेत शिंगे ज्याची असा, तांबडया डोळ्यांचा, कोळ्याने युक्त, कल्माष (बहुरंगयुक्त) असा वृषभ धन्याते लवकरच लक्ष्मीचा पति (धनवान) करितो ॥१८॥
अथवा पांढरा एक पाय ज्याचा असा व कोणत्याही वर्णाचा, बैल शुभ होय. (योवा सितैश्चचरणै: असा पाठ कोणी म्हणतात त्यांचे मती श्वेत चार पाय.) जर सर्वलक्षणयुक्त मिळत नाही तर शुभाशुभ मिश्रफलही घ्यावा. (शुभ व अशुभ या फलांचे अंतर करून एकही अशुभफल शेष रहाणार नाही तर तो घ्यावा असे कोणी म्हणतात) ॥१९॥
॥ इतिबृहत्संहितायांगोलक्षणंनामैकषष्टितमोध्याय: ॥६१॥