बृहत्संहिता - अध्याय ३१
शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.
पीतवर्ण दिग्दाहं (दिशांचा लाल रंग किंवा ज्वला दिसणे) राजभय करणारा होतो. अग्निवर्ण दिग्दाह देशनाश करितो. आरक्त दिग्दाह होईल त्यावेळी अपसव्य वायु असा झाला तर धान्यनाश होतो ॥१॥
जो दिग्दाह अत्यंतकांतीने प्रकाश करतो व सूर्यासारखी ज्याची छायाही दिसते तो राजास मोठे भय सांगतो व रक्तासारखा असला तर युद्धे होतात ॥२॥
दिग्दाह पूर्वदिशेस दिसला तर राजे व क्षत्रियजाति यांस पीडा होते. आग्नेयीस दिसला तर शिल्पि व कुमार यांस पीडा. दक्षिणेस दि. वेश्या व उग्रपुरुष यांस पीडा. निऋतीस दि. तर दूत व पुनर्भू स्त्रिया यांस पीडा ॥३॥
पश्चिमेस दि. तर शूद्र व कृषिकरणारांस पीडा. वायव्येस दि. तर चोर व अश्व यांस पीडा. उत्तरेस दि. तर ब्राम्हाणांस पीडा. ईशानीस दि. तर पाखंडी व व्यापारी यांस पीडा होते ॥४॥
आकाश निर्मल, नक्षत्रे स्वच्छ, वायु प्रदक्षिणगति, दिग्दाह सुवर्णासारखा, असे हे असले तर राजासहवर्तमान सर्व लोकांचे कल्याण होते ॥५॥
॥ इतिबृहत्संहितायांदिग्दाहलक्षणंनामैकत्रिंशोध्याय: ॥३१॥
N/A
References : N/A
Last Updated : February 21, 2015
TOP