मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय १०५

बृहत्संहिता - अध्याय १०५

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


मी वराहमिहिराने ज्योतिषशास्त्ररूप समुद्रात बुद्धिरूपं मंदरपर्वताने मंथन करून लोकांस प्रकाश करणारा असा हा शास्त्ररूप चंद्र काढिला ॥१॥

हे शास्त्र करणारा जो मी त्याने प्राचीन आचार्यांचे ग्रंथ सोडले नाहीत. त्यांते पाहूनच हे शास्त्र केले. यास्तव, हे सुजनहो, इच्छेप्रमाणे जे चांगले ते सेवन करा ॥२॥

अथवा सुजन, दोषसमुद्रापासून अल्पही गुण पाहून तो गुण प्रसिद्ध करतो. नीच त्याचे विपरीत म्ह० गुणामुद्रापासून अल्पही दोष पाहून तो प्रसिद्ध करतो. अशी ही साधु व असाधु यांची प्रकृति (स्वभावच) आहे ॥३॥

दुर्जन हाच अग्नि यामद्ये तापवलेले असे काव्यरूप सुवर्ण शुद्ध होते; यास्तव दुष्टजनांस प्रयत्नाने श्रवण करवावे ॥४॥

ग्रंथ सर्वत्र फिरत असता (प्रति होताहोता) पदाचा नाश होतो (अशुद्ध होते) तो लेखकदोषामुळे अथवा बहुश्रुत पंडितांच्या मुखापासून पूर्वापरसंगतीने अपशब्द होतात ते अथवा मी अल्पही अशुद्ध केले असेल किंवा कमी केले असेल ते विद्वानाने द्वेषभाव टाकून पूर्ण करावे ॥५॥

सूर्यादिग्रह, वसिष्ठादिमुनि, गुरु (आदित्यदासाख्य माझा पिता) यांच्या चरणी नमस्काराने झालेला, जो प्रसाद त्याने झाली आहे बुद्धि ज्यास, असा जो मी वराहमिहिर याने हे ज्योतिषशास्त्र संक्षिप्त केले, यास्तव पूर्वाचार्यांस माझा नमस्कार असो ॥६॥


॥ इतिश्रीवराहमिहिरक्रुतौबृहत्संहितायामुपसंहारोनामषडुत्तरशततमोध्याय: ॥१०५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP