हें महैकोद्दिष्ट श्राद्ध षोडश श्राद्धांहून निराळेंच आहे. म्हणून पुढें करावयाची जी सर्व एकोद्दिष्टश्राद्धें त्यांचें हें प्रकृतिभूत आहे असें म्हटलें आहे. हें पाकानेंच करावें. शक्य असल्यास या श्राद्धीं ब्राह्मण भोजनास सांगावा. शक्य नसल्यास अग्नींत होम करावा. कारण, आद्य मासिकें ब्राह्मणांस भोजन घालावें किंवा अग्नींत होम करावा, असें वचन आहे. ब्राह्मणांस विधिपूर्वक स्मश्रूकर्म, नखच्छेद करवून स्नान व अभ्यंग ही द्यावीत. नंतर क्षण, पाद्य, अर्घ्य, आसन, गंध, पुष्प, आच्छादन इतके उपचार द्यावेत. या श्राद्धांत धूपदीप देऊं नये. एकोद्दिष्ट देवहीन करावें. असें वचन आहे म्हणून १ ब्राह्मणच सांगावा. दिवसाच निमंत्रण करावें. अर्घ्यपात्र १ च असावें. स्वधा शब्द, नमः शब्द व पितृ शब्द हे नसल्यामुळें '' प्रत्तःल्लप्रेत इमांलोकान् करावें. कारण देवकार्याचा अभाव आहे. अग्नौकरणाचे बाबतींत विकल्प आहे. या श्राद्धांत पाणिहोम केला असतांही तें भक्षण करुं नये; अग्नींत टाकावें. पिंड एकच द्यावा. अनुमंत्रणादिक सर्वःअमंत्रक करावें. ' स्वदितं ' असा तृप्तिप्रश्न कात्यायनास युक्त आहे. अध्यक्षस्थानी ' उपतिष्ठतां ' असें म्हणावे. ' अभिरम्यतां ' या मंत्रानें विसर्जन करावें. ब्राह्मणांनी ' अभिरमताःस्म ' असें प्रतिवचन द्यावें. श्राद्धशेष भोजन नाहीं. शेवटी स्नान करावें. नवश्राद्धसंबंधी एकोद्दिष्टाचे ठायीं सर्व कर्म अमंत्रक करावें असें म्हटलें आहे. ब्राह्मणाचा अभाव असल्यास अग्नीत एकोद्दिष्ट करावें. तें असेः-- अग्नीचें ठायीं पायस शिजवून आज्यभागान्त कर्म केल्यावर अग्नीचे अग्रभागीं श्राद्धप्रयोग करुन अग्नीचे ठायीं प्रेताचें आवाहन करावें व गंधादिक उपचारानें पूजा करुन '' पृथिवीते पात्रं० '' इत्यादि मंत्नानें अन्नाचा संकल्प करुन ' उदीरतामवर ' याप्रमाणे ४ आवृत्तींनीं युक्त अशा ८ ऋचांनीं ३२ आहुतीनी हवन करुन पिंडदानादि श्राद्ध समाप्त करावें. अशा रीतीनें हें एकोद्दिष्ट स्त्रियांचेंही करावें.