त्या दिवशीं मध्याह्नकालीं नद्यादिकांचे ठायीं श्राद्धांग तिलतर्पण करुन देशकालांचें स्मरण केल्यावर प्राचीनावीती करुन अमुक गोत्रस्थामुकशर्मणोः ब्रह्मीभूतस्यास्मत्पितुः करिष्यमाण दर्शादि सर्व श्राद्धाधिकारार्थमाद्यपार्वणश्राद्धं करिष्ये '' असा पुत्रादिकानें संकल्प करावा. श्राद्धकर्ता शिष्य असल्यास त्यानें ब्रह्मीभूत गुरोः प्रत्यब्दादि श्राद्धधिकारार्थ तत्पितृसंबंधि नाम गोत्रोद्देश्यता सिध्यर्थच पार्वण श्राद्धं० '' असा संकल्प करावा. इतर सर्व सारखेंच. पुरुरवार्द्रसंज्ञक विश्वेदेव घ्यावे. पिता, पितामह, प्रपितामह यांचा नामगोत्रादिसह उच्चार करावा. सर्वत्र पित्यास ' ब्रह्मीभूत ' असें विशेषण मात्र अधिक योजावें. इतर सर्व कर्म प्रतिसांवत्सरिक श्राद्धाप्रमाणें जाणावें. कोणी ग्रंथकार शिष्य कर्ता असल्यास आत्मा, अंतरात्मा व परमात्मा यांस उद्देशून साधुरुरुसंज्ञक देवयुक्त असें सव्यानें देवधर्म नांदीश्राद्धाप्रमाणें अकराव्या दिवशीं पार्वणश्राद्ध करावें, असें म्हणतात. या श्राद्धाविषयीं सर्वत्र ठिकाणी विस्तार तोरोकृत संन्यासपद्धति या ग्रंथांत पहावा.