'' ॐभूः सावित्रीं प्रविशामि ॐतत्सवितुर्वरेण्यं ॐभुवः सावित्री प्र० भर्गोदेवस्य० ॐस्वः सावित्री० धियोयो० ॥ ॐभूर्भुवःस्वःसावित्रीं प्र० तत्सवितुर्वरेण्ययं ऋक् ॥ '' नंतर सूर्यास्तापूर्वी गृह्याग्नि प्रदीप्त करुन विच्छिन्न असल्यास पुनः संधानविधीनें, निरग्नि किंवा विधुरादिक असल्यास पृष्टोदिवि विधानानें अग्नि उत्पन्न करावा. पृष्टोदिविविधान कात्यायनाच्या वैश्वदेवप्रसंगी पूर्वार्धात सांगितलें आहे.
सूर्यास्तापूर्वी ब्रह्मान्वाधानः-- '' संन्यासं कर्तु ब्रह्मान्वाधानं करिष्ये '' असा संकल्प करुन अग्नीचें ध्यान इत्यादि कर्म करावे. नंतर आज्यसंस्कार करुन स्त्रुचि व स्त्रुवा या पात्रांस संस्कार करुन स्त्रुचि पात्रांत चार वेळ तूप घ्यावें व '' ॐस्वाहा '' या मंत्नानें आहुति देऊन '' परमात्मन इदं० '' असें म्हणून त्याग करावा. नंतर उदकसिंचनादि कर्म करावें. याप्रमाणें ब्रह्मान्वाधान सांगितले.
त्यानंतर सायंसंध्या, होम व वैश्वदेव हीं करुन अग्नीसमीप जागरण करावें.
प्रातःकाली नित्यहोम केल्यावर वैश्वदेवादिक करुन आग्नेय किंवा वैश्वानर स्थालीपाक करावा. '' करिष्यमाणसंन्यासपूर्वागभूतमाग्नेयस्थालीपाकं करिष्ये '' असा संकल्प करुन ध्यान केल्यावर "चक्षुषीआज्येनेत्यंतेत्रप्रधानमग्निं चरुणा शेषेण० '' इत्यादिक अन्वाधान करावें; व '' अग्नयेत्वाजुष्टंनिर्वपामि '' इत्यादि नामानें निर्वापादिक करावें. प्रधानहोम नाममंत्रानेंच करावा. याचप्रमाणें वैश्वानरस्थालीपाकपक्षींही जाणावें. नंतर '' तरत्समंदी० '' या मंत्राचा जप करुन कुश, सुवर्ण व रौप्य यांनीं युक्त असलेल्या उदकानें स्त्रान करुन देशकालाचें स्मरण करुन '' संन्यासांगभूतं प्राणादिहोमं पुरुषसूक्तहोमं विरजाहोमं च तंत्रेण करिष्ये '' असा संकल्प करावा व अन्वाधानांत '' आज्येनेत्यंते प्राणादि० पंचदेवताःसमिच्चर्वाज्यैःपुरुषं पुरुषसूक्तेन प्रत्यृचे षोडशवारं समिच्चर्वाज्यैः प्राणाद्येकोनविंशतिदेवताविरजामंत्रैः प्रतिद्रव्यमेकैकसंख्यसमिच्चर्वाज्याहुतिभिः प्रजापर्ति सकृदाज्येन" शिजवून आज्यभागांत कर्म केल्यावर '' प्राणाय स्वाहा० '' इत्यादि पांच मंत्रांनी समिधा, चरु व आज्य या तीन द्रव्यांचा होम एकदां करुन देवतेनुसार त्याग म्हणून '' सहस्त्रशीर्षा० '' ह्या सोळा ऋचांनीं प्रत्येक ऋचेनें निरनिराळ्या तीन द्रव्यांचा होम करुन '' पुरुषायेदंनमम '' असा सर्वत्र त्याग ह्नणावा.