प्राणापानव्यानोदानसमानामेशुध्यन्तांज्योतिरहंविरजाविपाप्माभूयासस्वाहा प्राणादिभ्यइदं०
वाङ्मनश्चक्षुःश्रोत्रजिह्णघ्राणरेसोबुद्धयाकूतिःसंकल्पामेशुद्धयन्तांज्योति० वागादिभ्यइदं०
त्वकचर्ममासरुधिरमेदोमज्जास्नायवोस्थीनिमेशुद्धयन्तां० त्वगादिभ्यइदं०
शिरःपाणिपादपार्श्वपृष्ठोरुदरजङ्घशिश्नोपस्थपायवोमेशुद्धयं० शिरआदिभ्य०
उत्तिष्ठपुरुषहरितपिङ्गललोहिताक्षदेहिदेहिददापायितामेशुद्धयं० पुरुषादिभ्य०
पृथिव्यापस्तेजोवाय्वाकाशामेशुद्धयं० पृथिव्यादिभ्य० शब्दस्पर्शरुपरसगन्धामेशुद्धयं०
शब्दादिभ्य० मनोवाक्कायकर्माणिमेशुद्धयंतां० मनआदिकर्मभ्य० अव्यक्तभावैरहंकारैर्ज्योतिरहं०
अव्यक्तादिभ्य० आत्मामेशुद्धयंतांज्यो० आत्मानइदं० अंतरात्मामे० अंतरात्मन० परमात्मामे०
परमात्मन० क्षुधेस्वाहा क्षुधइदं० क्षुत्पिपासायस्वाहा क्षुत्पिपासायेदं० विविट्यैस्वा० विविट्या०
ऋग्विधानाय० कषोत्कायस्वा० क्षुत्पिपासामलंज्येष्ठामलक्ष्मींनाशयाम्यहं ।
अभूतिमसमृद्धिंचसर्वानिर्णुदमेपाप्मानस्वाहा अग्नयइदं०
अन्नमयप्राणमयनोमयविज्ञानमयमानंदमयमात्मामेशुद्धंतां० अन्नमयादिभ्य० ॥
याप्रमाणें समिधा, चरु व आज्य, यांपैकीं प्रत्येक द्रव्याच्या चाळीस आहुतींनी होम करुन '' यदिष्टं यच्च पूर्त यच्चापद्यनापदि । प्रजापतौ तन्मनसि जुहोमि ॥ विमुक्तोऽहं देव किल्बिषात्स्वाहा ॥ '' या मंत्रानें आज्याची आहुति द्यावी व '' प्रजापतयइदं० '' असा त्याग ह्नणावा. नंतर पुरुषसूक्त, '' अग्निमीळे० '' इत्यादि चार वेदादिकांचा जप करुन स्विष्टकृदादि होमशेष समाप्त करावा व ब्रह्मचारी इत्यादिकांस गाई, हिरण्य व वस्त्रादिक देऊन '' समासिंचन्तुमरुत '' या मंत्रानें गृह्याग्नीचें उपस्थान करावें व त्यांत काष्ठपात्रें दहन करावींत. धातूची पात्रें असतील तर तीं गुरुला द्यावींत. '' अयंते योनि० '' ही ऋचा व '' याते अग्नि यज्ञियातनूस्तये ह्यारोहमानं० '' इत्यादि यजुर्मत्र तीन वेळ म्हणून अग्नीची ज्वाला प्राशन करीत आपले ठिकाणी अग्नीचा समारोप करावा. यावर कृष्णाजिन घेऊन घरांतून बाहेर निघावें; व '' सर्वे भवन्तु वेदाढ्याः सर्वे भवन्तु सोमपाः । सर्वे पुत्रमुखं दृष्टा सर्वे भवन्तु भिक्षुकाः ॥'' या मंत्रानें पुत्रादिकांस आशीर्वाद देऊन '' नमे कश्चित् नाहं कस्यचित् ( माझा कोणी नाही व मी कोणाचा नाही. ) असें पुत्रादिकांस सांगून विसर्जन करावें. नंतर जलाशयाजवळ जाऊन अंजलीनें उदक घ्यावें व '' आशुःशिशान० '' या सूक्तानें अभिमंत्रण करुन '' सर्वाभ्यो देवताभ्यः स्वाहा '' असें म्हणून उदक सोडावें. तिथ्यादिकांचें स्मरण करुन '' अपरोक्ष ब्रह्मवाप्तयेसंन्यासं करोमी '' असा संकल्प करुन उदकाची अंजली घेऊन '' ॐएष हवाग्निः सूर्यः प्राणं गच्छ स्वाहा ॐ स्वां योनिं गच्छस्वाहा ॐ आपोवैगच्छ स्वाहा '' या तीन मंत्रांनीं उदकांत तीन अंजली द्याव्या. '' पुत्रेषणा, वित्तेषणा, लोकेषणा सर्वेषणा मया परित्यक्ता अभयं सर्व भूतेभ्यो मत्तःस्वाहा '' या मंत्रानें उदकांजलि जलांत टाकावा; याप्रमाणें पुनः अभय देऊन
यत्किंचिद्वन्धनंकर्मकृतमज्ञानतोमया । प्रमादालस्य दोषोत्थंतत्सर्वसंत्यजाम्यहम् ॥
त्यक्तसर्वोविशुद्धात्मागतस्नेहशुभाशुभः । एषत्यजाम्यहंसर्वकामभोगसुखादिकम् ।
रोषंतोषंविवादंचगन्धमाल्यानुलेपनम् । भूषणंनर्तनंगेयंदानमादानमेवच ।
नमस्कारंजपंहोमंयाश्चनित्याःक्रियामम । नित्यंनैमित्तिकंकाम्यंवर्णधर्माश्रमाश्चये ।
सर्वमेवपरित्यज्यददाम्यभयदक्षिणाम् । ४ पद्भयांकराभ्यांविहरन्नाहंवाक्कायमानसैः ।
करिष्येप्राणिनांपीडांप्राणिनःसन्तनिर्भयाः ५
असें म्हणावें व सूर्यादि देव आणि ब्राह्मण यांच्या साक्षित्वानें ध्यान करुन नाभिप्रमाण उदकांत पूर्वाभिमुख उभें राहून पूर्वीप्रमाणें सावित्रीप्रवेश केल्यावर '' तरत्समंदी० '' या सूक्ताचा पाठ करावा, व '' पुत्रेषणाया लोकेषणायाश्च व्युत्थितोहं भिक्षाचर्य चरामि ॥ '' असें म्हणून उदकांत जलाची आहुती द्यावी.