संन्यासग्रहणास उत्तरायण हा प्रशस्त काल होय. आतुरास दक्षिणायनही प्रशस्त आहे. त्यांत गृह्याग्निमंत व गृह्याग्निविधुर यांविषयींचा प्रयोग सांगतो. शांत्यादि लक्षणांनीं युक्त असा उत्तम गुरु पाहून त्याच्या जवळ तीन महिनेपर्यंत सर्व यतिधर्म चांगले अवलोकन करावेत; व गायत्रीजप, रुद्रजप व कूष्मांड होम इत्यादिकांनीं देहशुद्धि केल्यावर रिक्ता तिथीस देशकालांचें स्मरण करुन
'' अमुकस्य मम करिष्यमाणसंन्यासेधिकारार्थ चतुः कृच्छ्रात्मकप्रायश्चित्त प्रतिकृच्छ्रं तत्प्रत्याम्नायैकैकगोनिष्कयद्वाराहमाचरिष्ये । कृच्छ्रप्रत्याम्नायगोनिष्कयंद्रव्यं विप्रेभ्यो दातुमुत्सृजे ॥ ''
असा संकल्प केल्यावर रुप्याचा निष्क, अर्धा निष्क किंवा पाच निष्क यांतून कोणत्याही प्रमाणाचें प्रत्येक गोनिष्क्रय द्यावें. एकादशीस किंवा द्वादशीस जशी ब्रह्मरात्री प्राप्त होईल त्याप्रमाणें श्रद्धें आरंभावींत. येथें अनाश्रमी असल्यास चार कृच्छ्रें व इतरांस तप्त कृच्छ्र असें निर्णयसिंधूंत सांगितलें आहे. आपल्या नवश्राद्धंत षोडशश्राद्धें व सपिंडीकरण ही साग्निकानें पार्वण विधिनें व निरग्निकानें एकोदिष्ट विधिनीं करावी; असें कांही ग्रंथकारांचे ह्नणणें आहे. हीं करुं नयेत, असें दुसर्या ग्रंथकारांचें मंत आहे.