मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीलाखाभक्त चरित्र २

श्रीलाखाभक्त चरित्र २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ पद ॥ ( भाव धरारे )
उमग खेळासी । आलि कोल्हाटिण रंगासि ॥
विश्वास स्तंभ साचार । आहेत केवढा थोर ॥
भावाचा बांधिला दोर । फ़िराया तिजसी ॥
सत्कर्म हाच कीं थाळा । या दोरावर ठेवियला ॥
आंत उभी भक्तिवेल्हाळा । सांवरि तोलासि ॥
हातिं बांबु पापपुण्याचा । नासाग्निं रोख दृष्टीचा ॥
घे अनुभव स्वानंदाचा । बघे न कवणासी ॥
गणु म्हणे, उड्या जरि मारी । आधार सोडिना दोरी ॥
ही विद्या येइल सारी । वंदितां गुरुसी ॥२१॥
हें पद सर्व वेदांतपर आहे. या पदाची गोडी त्या मदांध झालेल्या राजपुत्राला कशी लागावी ?
लाखा पुढें म्हणाला,

॥ लावणी ॥
सौंदर्यपात्र हेमाचें । तुजलागिं हरीनें दिलें ॥
सन्नीतिकेशरानें या । तें भरून ठेविं चांगलें ॥
( चाल ) तेथही विषयवासना; नरक सज्जना ! मुळिंच ठेविं ना ॥
हर्म्य जे झाले । ते भूप राहाया भलें ॥
शोभतो भव्य भालासी । सज्जना । तिलक चंदनी ॥
तेथेंच प्रयत्नानें रे ! । का चिखल लावितो कुणी ॥
( चाल ) हत्तिची भव्य अंबारी, बसाया बरी, तेथ ना भरी ॥
पंथिंचा केर । गणु म्हणे सांगुं कुठवर ॥
लाखानें आपल्या मुलीला तसाच उपदेश केला.

॥ श्लोक ॥
त्या हेमपात्रीं मुलि ! जाण विष्ठा ।
कीं ठेविल्या ना रुचते वरिष्ठा ॥
वाराह त्यासी नित सेवितात ।
ना दुर्नीति या बरवी जगांत ॥२३॥

॥ पद ॥
हा पंचबाण हैराण करी जगताला ।
देइना कधीं हा मान विनयनीतीला ॥
सेविल्या मद्य जाणीव कुठुन ती रहावी ।
मिसळल्या मीठ दुग्धास गोड ना ठेवीं ॥२४॥

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
कोल्हाट्यास वरी, नको धनिक हा पाहे मनीं शोधुनी ।
मेघा ओंगळ ती त्यजी म्हणुन का त्या सांग सौदामिनी ॥
चंद्रासी क्षय, चांदणें म्हणुनि का त्याला नभीं सोडतें ।
पाहूनी विष अंगिंचें चपलता सर्पास ना त्यागिते ॥२५॥
इतका बोध करूनहि शेवटीं पालथ्या घागरीवर पाणी ! बापाच्या सांगण्याकडे तिनें अजिबात दुर्लक्ष केलें.

॥ दिंडी ॥
निघुन कन्या ती गेलि अखेरीसी । त्याजुनि अपुल्या त्या श्रेष्ठशा पित्यासी ॥
धनिकसंगें, कोठून राहणार । मानसासी कावळा वदा स्थिर ॥२६॥
सकाळीं लाखा उठून पाह्तो तों आपल्या शेजारीं मुलगी नाहीं. त्यांनीं जाणलें कीं, ही बहुतेक निघून गेली असावी. तो देवास म्हणतो -

॥ छक्कड ॥
बरें झालें जगन्नाथजी ! मुलीच्या त्रासांतुन सुटलों ।
शांतिच्या आसनावरि बसलों ॥
कामांध जनाची नको दयाळा संगत थोडीशी ।
मिठाचा खडा दूध नाशी ॥ ॥२७॥

॥ ओवी ॥
गेली कन्यका निघोन । खेळाप्रती पडलें शून्य ।
त्यायोगें उपोषण । घडूं लागलें लाखासी ॥२८॥

॥ दिंडी ॥
गुजर देशींचा मूप एक आला । जगन्नाथासी पुरिंत वंदण्याला ।
तया पाहुन हर्षले क्षेत्रावासी । पार ज्याच्या ना मुळिंच वैभवासी ॥२९॥

॥ ओवी ॥
जगदीशाची आराधना । चाललीसे एक महिना ।
भोजन देई चहुवर्णा । दक्षिना द्विजांकारणें ॥३०॥

॥ श्लोक ॥
स्वप्नांत एके दिवशीं रमेश । कीं बोलिला येउन त्या नृपास ॥
लाखास माझ्या मिरवीत न्यावें । सुग्रास हें भोजन त्यास द्यावें ॥
हें स्वप्न पाहून तो गुजर देशाचा राजा जागा हाऊन जगदीशाची प्रार्थना करूं लागला --

॥ पद ॥
श्रीजगन्नाथमहाराज । अजीं सामळो ये मारी ॥ध्रु०॥
पालखडी यें लाखा माटे नहीं करी भगवान ।
आ बेटा कोल्हाटी ओछो है अनीतीनी खाण ॥
कुतरुं, बंदर बेसडवा क्या गजकी अंबारी ।
मालपुवा सूकरना माटे कोन करे गिरिधारी ॥३२॥
देव लक्ष्मीस म्हणतात -

॥ श्लोक ॥ ( पृथ्वी )
नृपाळ मुळिं नायके, उलट शास्त्र सांगे मशीं ।
उपोषित हिरा रमे ! करूं मि यास युक्ती कशी ? ॥
न घेत धनधान्य तो लवहि खेळ केल्याविना ।
तदीय बघ लागली बहुत काळजी मन्मना ॥३३॥

॥ ओवी ॥
एके दिवशीं जगन्नाथ । स्वप्नीं सांगे लाखाप्रत ।
वृत्ति घ्यावी अयाचित । उपोषण हें नाहीं बरें ॥३४॥

॥ दिंडी ॥
अशा पाहुन स्वप्नास भक्तराणा । असूं गाळी टपटपा नेत्रिं जाणा ॥
काय देवा ? मी अयाचीतसेवूं । अविधि कृत्या या करुनि कुठें राहूं ? ॥३५॥

॥ कटिबंध ॥
पांगळा, खुळा, आंधळा, लुळा बावळा अशांच्या साठीं ।
बोललें अयाचित योग्य पहा जगजेठी ॥
संन्यासि, अग्निहोत्र्यासी, ब्रह्मचार्‍यासि अयाचित द्यावें ।
यावीण तें न इतरांनिं मुळिंच सेवावें ॥
( चाल ) मी लुळा, खुळा, संन्यासी मुळिं नसें ॥
सेवुं तें अयाचित देवा ! मग कसें ? ॥
करुनियां खेळ बाजारिं, खाइन, भाकरी, ती न मिळे तरी ।
मरेन उपवासीं । गणु म्हणे, पटेना अविधि कृत्य संतासी ॥३६॥

॥ आर्या ॥
ऐकुनि वच लाखाचें देव निरुत्तर असे पहा झाला ।
न्यायाधिशास स्मृतिची किंमत वाटे, मुळीं न चोराला ॥३७॥
इकडे लाखाची मुलगी सुखविलासांत रंगून दंग झाली आहे. तिला बापाची आठवनसुद्धां होईना. लक्ष्मीनें तिच्या डोळ्यांत अंजन घालून तिला शुद्धीवर आणण्याकरितां तिच्या आतेचें रूप घेतलें. लाखाला एक म्हातारी बहीण होती. तिचें रूप घेऊन ती तिच्या महालांत शिरली. महालांत एकटीच पलंगावर सुखांत लोळत पडलेल्या त्या पोरीला पाहून तिनें तिची कानउघाडणी करण्याला आरंभ केला.

॥ पद ॥
उपवासि मरत म्हातारा । त्याचि ना खबर गे तुजसी ॥
नेसून भरजरी शालू । ऐटींत पलंगीं बससी ॥
( चाल ) धि:कार तुझ्या कृत्यास, असो हा खास, कां न मेलीस ॥
लहान असतांचि । तूं पुतळी दुर्नीतीची । अवदसे ॥३८॥

॥ ओवी ॥ ( जात्यावरील )
बाळपणांत ज्यांनीं तुसी । वागविलें कडेखांद्याला ।
न्हाउ, धुऊं, खाउं घातलें । त्याचा उपकार बरा फ़ेडिला ॥३९॥
हें आत्याबाईचें भाषण ऐकून मुलगी मनांत थोडी चरकली; व तिचें समाधान करण्यारितां मुलगी म्हणते -

॥ लावणी ॥
आहे त्याची मला जाणीव काय करुं परी ।
हट्टि तो मुळिंच म्हातारा, क्षण एक सोडिना पुरी ॥
काष्ठाचें एक बाहुलें, त्यासि मानितो -- ।
जगदीश; असा बघ वेडा, तेथेंच द्वारिं बैसतो ॥
( चाल ) तो आल्यास माझ्या घरीं,
घालीन भाकरी, सर्वतोपरी ॥
सूख लागेल । माझेंहि नांव होइल ॥४०॥
आत्याबाई म्हणाली की, “ हें जर खरें आहे तर तूं होऊन त्याला बोलावण्याला कां जात नाहींस ? ” तें ऐकून मुलगी म्हणाली, “ मी ग कशी त्याला बोलावण्यास जाऊं ? कारण -

N/A

References : N/A
Last Updated : September 18, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP