Dictionaries | References

लोहो

   
Script: Devanagari
See also:  लोह

लोहो     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. The word, although little used, differs not in sense from लाहो.

लोहो     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Great fondness for, attachment to, desire after.

लोहो     

 पु. लोभ ; स्नेह ; प्रेम ; आकर्षण ; लाहो . ( देवीचा गोंधळ घालतांना व पुढील म्हणीतच या शब्दाचा उपयोग होतो . इतर ठिकाणी सहसा येत नाही . ) [ सं . लोभ ] म्ह० देखला गोहो लागला लोहो . = लग्न होतांच किंवा नवर्‍याची गांठ पडतांच अल्लड मुलगी त्यावर प्रेम करुं लागली ( घराचा व आईबापांचा विसर पडला ).
 न. 
लोखंड .
लोखंडाचे केकेले शस्त्र , तरवार इ० . लोहाचे काळवखे पडिले । फररां आकाशु गवसिले । - शिशु ५८५ .
लोहभस्म ; लोखंडाच्या गंजापासून अगर किटापासून केलेले औषध .
रक्त . राया राणिएंचा जाला । जरि घे लोहाचा कांटांळा । - शिशु ४७१ .
सोने ; सुवर्णरुप धन . - वि .
तांबडा .
लोखंडी . [ सं . ]
०कांत  न. 
लोखंड आकर्षून घेणारा पदार्थविशेष ; लोहचुंबक .
लोखंडाची एक जात .
ह्या जातीच्या लोखंडाचे औषधार्थ केलेले भस्म ; तिख्याचे भस्म .
०कार  पु. लोहार ; लोखंडाचे पदार्थ बनविणारा . [ सं . ]
०किट्ट  न. 
लोखंडावरचा गंज ; जळलेले लोखंड .
मंडूर नांवाचे औषधी द्रव्य . [ सं . ]
०घंगाळ  न. मोठे लोखंडी घंगाळ ; काहील . सूर्यनारायण जेवावयास आले , साती दरवाजे उघडले , लोह घंगाळे पाणी तापविले । - आदित्यराणूबाईंची कहाणी - कहाण्या भाग १ . पृ . ९ .
०चुंबक  पु. लोखंडाच्या वस्तूला आकर्षण करणारा दगड ; लोहकांत . - वि . ( ल . ) हट्ट घेऊन बसणारा ; अनेक युक्त्या करणारा किंवा धरणे धरुन बसणारा ; झटून , चिकटून दुसर्‍यापासून द्रव्य घेतल्याशिवाय न सोडणारा माणूस . [ सं . ]
०चुंबकाकर्षण  न. एका लोहचुंबकाचे दक्षिण टोंक दुसर्‍या लोहचुंबकाच्या उत्तर टोंकाजवळ आणिले असतां त्यां मधील दिसून येणारे परस्पर आकर्षण .
०चुंबकप्रतिसारण  न. दोन लोहचुंबकाच्या उत्तर किंवा दक्षिण टोंकामधील परस्परांस दूर लोटणे .
०चूर्ण  न. लोखंडाचा कीस .
०तुला   ळा स्त्री .
लोखंडाची तागडी ; लोखंडी तराजू .
लोखंडी गज , दांडा
०दंड  पु. 
लोखंडी गदा ; पातकी लोकांना मारण्याची यमाची गदा - हत्यार .
यम , शनि यांच्या शांतीसाठी ब्राह्मणाला दान द्यावयाचा लोखंडी सोटा ; गज ; लोखंडी काठी . [ सं . ]
०दंडक्षेत्र  न. विना . पंढरपूर . शोधीत शोधीत ऋषीकेशी । आला लोहदंड क्षेत्रासी । दिंडीरवन म्हणती त्यासी । तेथे द्वारकावासी प्रवेशला । - ह ३६ . १८० .
०धुरोळा  पु. लोखंडाचा - लोखंडासारखा धुरळा - धूळ ; तांबडी धूळ . रणी उठिला लोहधुरोळा । तेथे चालो न शके वारा । - एरुस्व ९ . ३७ . [ सं . लोह + धुलि ]
०परिघ  पु. लोखंडी गदा - सोटा ; लोखंडी पहार . जे वनिता असे जारीण । तीस यमदूत नेती धरुन । लोहपरिघ तप्त करुन कामागारी दाटिती ।
०पेटि   का स्त्री . लोखंडाची पेटी ; तिजोरी ; ( इं . ) सेफ . सरकारी ब्यांकेसारखी सुरक्षित लोहपेटिकाच नाही . - आगर ३ . ६६ .
०बंद  पु. लोखंडाची सांखळी . दोही बाही कुंजरथाट । मद गाळित गजघंट । दाती लोहबंद तिखट । वीर सुभट वळंघले । - एरुस्व ८ . १६ .
०बंद    वि . सोनेरी . - शर
०भस्म   मंडूर नपु . लोखंडाच्या गंजापासून केलेले एक रसायन ; लोखंडाचे प्राणिद .
०मय वि.  
लोखंडाचा बनविलेला ; लोखंडी ; लोखंड असलेला ; लोहनिर्मित .
( ल . ) भयंकर ; क्रूर ; निर्घृण . [ सं . ]
०मार्ग  पु. लोखंडी रस्ता ; रेलवे ; आगगाडीचा रुळांचा मार्ग . सरकारने लोहमार्ग हिंदुस्थानांत केले ते आपल्या सोईसाठी आहेत . - टि १ . ३३ .
०लंगर  पु. लोखंडी बेड्या ; सांखळदंड . लोहोलंगर पायांत खिळविले । - ऐपो २०९ .
०शलाका  स्त्री. लोखंडाची सळई . लोहंगी , लोहांगी , लव्हांगी , लोहंगी काठी स्त्री . लोखंडाचे खिळे आणि कड्या जागोजाग बसवून मारामारीसाठी केलेला सोटा ; पहार . [ लोह + अंग ] लोहिवी स्त्री . तांबूसपणा . पुढां उपरति रागे लोहिवी । धर्ममोक्षाची शाखा पालवी । लाहलाहात नित्य नवी । वाढतीची असे । - ज्ञा १५ . १९४ . लोहार पु . लोखंडाचे खिळे , कोयते इ० अनेक पदार्थ करणारा कारागीर . [ सं . लोहकार ] लोहार काम न . लोखंडाच्या अनेक वस्तू करण्याचे काम ; लोहाराचे योग्य कर्म . लोहारकी स्त्री . लोहाराचा धंदा . लोहारडा पु . ( निंदेने किंवा कुत्सितपणे ) लोहार . लोहारसाळ स्त्री .
लोखंडी कामाचा कारखाना ; लोहाराची काम करण्याची जागा . लोहारसाळेंतून खुरप्याला पाणी पाजून आण .
लोहाराची भट्टी [ सं . लोहकार + शाला ] लोहें - स्त्री . पेटी ; तिजोरी . जैसी लोभियाचे हाती । सांपडे अवचिती धनलोहे । - एभा ७ . ५७० . लोहो आर्गळा - स्त्री . लोखंडाचा अडसर . कपाटे लोहो आर्गळा पंथ मोठे । - राक १ . २ . [ सं . लोह + अर्गळा ] लोहोदक - न . ज्यांत लोखंडाचा अंश आहे असे पाणी . [ लोह + उदक ] लोहोलोखंड - न . लोखंडाची भांडी , हत्यारे इ० वस्तू . [ लोह + लोखंड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP