-
पुस्त्री . १ जोडणी ; ऐक्य ; मिलाफ . २ सांधा ; जोड ; शिवण ; सांध्यांची रेषा , बिंदू . अस्ति यंत्र कीडिकीडी । संधि कळासु कडकडी । - भाए २०४ . बैसलो संधि भागीं तुज धरूनि चित्तीं - तुगा ३२० . ३ चीर ; भेग ; फट ; खांच ; खंड . भयें दडताती संधींत - नव २४ . १३४ . ४ अवघि ; मधील काल ; अवसर ; अवकाश . ५ गांठ ; पेर ; कांडें ; जोड ६ वर्णाचा योग ; स्वर किंवा व्यंजनें यांचा जोड , मीलन ; सामासिक शब्दाच्या अंत्य व प्रारंभींच्या वर्णाचें मेलन . ७ लक्ष्य ; दृष्टि ; डोळा ; इच्छा ; उद्देश . भिक्षुक पैक्यावर संधि ठेवून यजमानाचें आर्जव करितो . करून आले दक्षिण संधी । - ऐपो २६७ . ८ युग , मन्वंतर , कल्प वगैरेपैकीं एक संपूर्ण होऊन दुसरें लागण्याच्या मध्यंतरींचा काल ; संधिकाल . ९ चोरानें भिंतीस पाडलेलें भोंक , बीळ , विवर , भुयार , खिंड , भगदाड . १० योग्य वेळ ; योग्य समय ; ऐन वेळ ; आणिबाणीची वेळ ; अनुकूल वेळ . यास्तव मोठया संधीस सूज्ञांनीं दोहोंच्या स्थितीकडे लक्ष्य द्यावें . - नि १ . ११ ( ल . ) समेट ; तह ; सलाह ; ऐक्य ; मिलाफ ; तडजोड ( मैत्री , नातें , सख्य वगैरेची ). मज बरोबर संधि करावयास आली होती . - कमं २ . - एभा १९ . १५६ . [ सं . सम् - धा = ठेवणें ]
-
०काल पु. दोन कालांच्या मधील अवधि . आयुष्याच्या अशा संधिकालावर तुम्ही उभे आहांत . - केले १ . ३७३ .
-
०ग वि. प्रत्येक सांध्यांतून जाणारें , भिनणारें ( रोग , विष , औषध वगैरे ).
-
०गत वि. सांध्यांत असलेला , शिरलेला ( वायु , वात , रोग वगैरे ).
Site Search
Input language: