देव अंगात येतात त्या येलचां गाणॉं
नारानदेव पावण्या आला, काय काय बसकार केला?
पनांफ़ुलां भरलां त्याला वगमान केला..
वाघिबादेव पावण्या आला, काय काय बसकार केला?
पनांफ़ुलां भरलां त्याला वगमान केला..
हिरोबादेव पावण्या आला, काय काय बसकार केला?
पनांफ़ुलां भरलां त्याला वगमान केला..
हिमायदेव पावण्या आला, काय काय बसकार केला?
पनांफ़ुलां भरलां त्याला वगमान केला..
(पावण्या-पाहुणा, बसकार-बैठकव्यवस्था, वगमान-स्वागत)
देव अंगात येतात त्या येलचां गाणॉं
नारानदेव पाहुणा आला, त्याचे स्वागत कसे केले?
आसन दिले बसण्याला, पानाफ़ुलांचे झुबके दिले..
वाघोबादेव पाहुणा आला, त्याचे स्वागत कसे केले?
आसन दिले बसण्याला, पानाफ़ुलांचे झुबके दिले..
हिरोबादेव पाहुणा आला, त्याचे स्वागत कसे केले?
आसन दिले बसण्याला, पानाफ़ुलांचे झुबके दिले..
हिमायदेव पाहुणा आला, त्याचे स्वागत कसे केले?
आसन दिले बसण्याला, पानाफ़ुलांचे झुबके दिले..
देव अंगात येतात त्या येलचां गाणॉं
आणा गावतरी शेण आणा शाजूख पाणी
शेणपाण्याची लोटली सारवना हो
सोनके पिठाचं भरीलं चौक हो
गंगेच उदक सारवीलं चारी कोन
बहिरी देवा तुमचे घरी तेलवाण
चेडोबा देवा तुमचे घरी तेलवाण
येताळा देवा तुमचे घरी तेलवाण
खंडरावा देवा तुमचे घरी तेलवाण
कळसाई देवा तुमचे घरी तेलवाण
तेलवाण
आणा गायीचे शेण, आणा स्वच्छ पाणी
शेणपाण्याचे सारवून घ्या जमीन हो
सोनेरी पिठाने आखा चौकोन हो
गंगेचे पाणी शिंपडा चारी कोपर्यात
बहिरी देवा, या, हे तुमच्या घरचेच तेलवाण
चेडोबा देवा, या, हे तुमच्या घरचेच तेलवाण
येताळा देवा, या, हे तुमच्या घरचेच तेलवाण
खंडरावा देवा, या, हे तुमच्या घरचेच तेलवाण
कळसाई देवा, या, हे तुमच्या घरचेच तेलवाण
(तेलवाण-लग्नाआधी करण्याचा एक विधी.)