लग्नाची गाणी - सांगणे
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
सांगणे
बंधूच्या पारावरी नारली बाग लावेला
नारली बाग लावेला, नारली डोला देती
तेठ मारली डोला देती
मी पतीला सांगू किती
माझ्या चोळीच्या झाल्या वाती
(चोळीच्या वाती होणे-विपन्नावस्था येणे)
सांगणे
भावाच्या अंगणात नारळीची बाग लावली आहे
नारळी बागेत हेलकावतात माड....
तेथे माड हेलकावतात
(आणि इथे माझी काय अवस्था आहे?)
मी पतीला सांगू किती
माझ्या चोळीच्या झाल्या वाती!
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP