मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
गरसोलीसाठी

लग्नाची गाणी - गरसोलीसाठी

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


गरसोलीसाठी
बारा वर्षं सखू गेली गं गरसोलीसाठी
जाईन पाईन बाबा जोगीयापाठी

-नको लेकी जाऊ माझ्या गं, जोगीयापाठी
अर्धे राज्य देईन लेकी गं बसून खायाला

-काय करू बापा तुझ्या रं अर्धे राज्याला?
बारा वर्षं सखू गेलीं गं गरसोलीसाठी

मंगळसूत्रासाठी
बार वर्षे सरून गेली मंगळसूत्राचा धनी शोधण्यात
आता मी जातेय निघून जोग्यापाठोपाठ

-नको जाऊ माझ्या लेकी ग जोग्यापाठोपाठ
अर्धे राज्य देईन, लेकी ग, बसून खाता येईल

-काय करू बापा तुझे अर्धे राज्य घेऊन.....?
मंगळसूत्राचा धनी शोधण्यात
बारा वर्षे गेली सरून

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP