लग्नाची गाणी - हौस
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
हौस
तला बांधला काचूचा, पाणी लागलाय मोत्याचा...
जयू तुझ्या सासर्यानी, तुला काय केलं हौशीला?
गल्यातले गंठण केली, आणि काय पाहिजे हौशीला!
तला बांधला काचूचा, पाणी लागलाय मोत्याचा...
जयू तुझ्या सासूनी, तुला काय केलं हौशीला?
हातातल्या बागड्या केली, आणि काय पाहिजे हौशीला!
हौस
तळे बांधले काचेचे, पाणी लागले मोत्यांचे....
जयू तुझ्या सासर्याने, तुला काय दिले हौशीने?
गळ्यातली माळ दिली, अजून काय पाहिजे हौशीला!
तळे बांधले काचेचे, पाणी लागले मोत्यांचे....
जयू तुझ्या सासूने, तुला काय दिले हौशीने?
हातातल्या बांगड्या दिल्या, अजून काय पाहिजे हौशीला!
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP