लग्नाची गाणी - मैतरसाठी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
मैतरसाठी
बांधाचे पाणी ठेवली वाटी
बाई गं मैतारासाठी
बांधाचे पाणी ठेवला टोकर
बाई गं मैतरू डोकर
बांधाचे पाणी ठेवला विळा
बाई गं मैत्रा लावते टिळा
(ताकर-बांबू, डोकर-म्हतारा, टिळा लावणे-लग्नासाठी प्रथम हक्क सांगणे)
मित्रासाठी
बांधाच्या मागे ठेवली वाटी
बाईने ग, मित्रासाठी!
बांधाच्या मागे बांबू ठेवला
बाईचा मित्र आहे म्हतारा!
बांधाच्या मागे ठेवला विळा
बाई मित्राला लावते टिळा!
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP