लग्नाची गाणी - साळ्याचा भात
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
साळ्याचा भात
दाराशी पिंजरा टांगतो रं, त्यामा राघू बोलतो रं
पिंजरा गेलाय तुटूनी रं, राघू आलाय उठूनी रं
चलमा राघू माहेर, माझं माहेर दूरच्या दूर
साळ्याचा भात मला कांडवयना
साळ्याचा भात मला रांधवयना
साळ्याचा भात मला जेववयना
शेजारणी आली पेजीवं रं,शेजारणी आली पेजीवं
शीत ना मिळं पेजीत रं, शीत ना मिळं पेजीत
शेजारणी असा रडीते रं, शेजारनी असा रडीते
साळींचा भात
दाराला पिंजरा लटकतो, त्यातून राघू बोलतो
पिंजरा गेला तुटून, राघु आला उठून
चल रे राघू माहेराला, माझं माहेर दूरावर
इथे साळींचा भात मला कांडवत नाही
इथे साळींचा भात मला रांधवत नाही
इथे साळींचा भात मला खाववत नाही
शेजारीण आली पेज मागायला
तर पेजेत तिला भाताचे शीतच मिळेना
(मी नुसते गरम पाणी पीत होते....ते पाहून)
शेजारीण रडू लागली....
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP